टेस्ट ट्युब बेबीनंतर आता टेस्ट टयुब गाय, शेतकऱ्यांना होणार मोठी मदत; केंद्रीय मंत्री गडकरींनी सांगितला मास्टर प्लान

टेस्ट ट्युब बेबीनंतर आता टेस्ट टयुब गाय विकसीत केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होईल,अशी माहिती केंद्रीय मंत्री गडकरींंनी दिली.

टेस्ट ट्युब बेबीनंतर आता टेस्ट टयुब गाय, शेतकऱ्यांना होणार मोठी मदत; केंद्रीय मंत्री गडकरींनी सांगितला मास्टर प्लान
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 12:35 PM

राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक जळून गेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. तर दिवाळीच्या तोंडावर सरकराने शेतकऱ्यांना अग्रीम मदत दिली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत. याचदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा दावा केला आहे. आता टेस्ट ट्युब बेबीनंतर आता टेस्ट टयुब गाय विकसित केली जाणार, असं सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मास्टर प्लान सांगितला.

लोकनेते दत्ताजी मेघे यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय , व शालिनीताई मेघे पशु रुग्णालय लोकार्पण सोहळा कार्यक्रम नागपुरात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमातील भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाचं भाष्य केलं.

Loading...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की,’दत्ता मेघे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आपला प्रवास सुरू केला. नागपूर आणि वर्धा या ठिकाणी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या. दत्ता मेघे यांची इच्छा होती की, रामटेक येथे पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू व्हावे. त्यांचे हे स्वप्न सागर मेघे यांनी पूर्ण केले आहे. विदर्भात मदर डेअरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. नागपुरातून दररोज दहा लाख लिटर दूध मदर डेअरी गोळा करीत आहे. मात्र, कोल्हापूरमध्ये जेवढे दूध उत्पादन होते, तेवढे उत्पादन संपूर्ण विदर्भातही होत नाही, याची मला खंत वाटते. या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या माध्यमातून आणि मदर डेअरीच्या पुढाकारातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे’.

‘ज्याप्रमाणे टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्रज्ञान विकसित झाले, त्याचप्रमाणे आता टेस्ट ट्यूब गाय अर्थात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गायींच्या प्रजननाचा प्रयोग केला जाणार आहे. देशी गायींचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात या भागात दूध उत्पादन सर्वाधिक होईल आणि मदर डेअरीच्या माध्यमातून या क्षेत्राला मोठी चालना मिळेल. आज ऑरेंज बर्फी दिल्लीतील नागरिकांनाही आवडू लागली आहे.  दोन्ही महाविद्यालये कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राच्या विकासासाठी अधिक भर देणार आहेत. आपल्या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या आहेत. मात्र, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले, तर शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील. शेळीपालन प्रकल्प, डेअरी उद्योग आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा विकास झाला, तर शेतकरी निश्चितच समृद्ध होईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.

‘मोहन भागवत हे स्वतः पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत आणि त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे, ही आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. हा प्रकल्प निश्चितच यशस्वी होईल, याची मला खात्री आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us