AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! राष्ट्रवादीचे 20-30 आमदार फुटणार? सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, विधानसभा निवडणुकी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट झाली. तिथे राजकीय चर्चा झाली नाही. माझ्या रोहा शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आलं आहे. त्याच्या भूमिपूजनासाठी येण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती केली, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे.

मोठी बातमी ! राष्ट्रवादीचे 20-30 आमदार फुटणार? सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, विधानसभा निवडणुकी...
sunil tatkareImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 11:55 AM
Share

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वेगळाच बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली आहे. अजितदादा गटाचे 20 ते 30 आमदार फुटणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीपासून संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे ते काहीही बोलत असतात. आमचा पक्ष एकसंघ आहे. आमचे आमदार एकत्र आहेत. कुठेही जाणार नाहीत, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे.

संजय राऊत ज्येष्ठ पत्रकार आहेत. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. पण विधानसभा निवडणुका झाल्यापासून त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. कल्पोकल्पित कथा रचणं आणि सकाळी नरेटिव्ह सोडून देणं एवढंच काम राऊत यांना उरलं आहे. ते तेवढंच काम करत असतात. राष्ट्रवादी एकसंघ आहे. आमचे 41 आमदार सुनेत्रा पवारांच्या नेतृत्त्वात काम करत आहेत. कोणीही फुटणार नाही, असा दावा सुनील तटकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.

विलिनीकरणात तथ्य नाही

यावेळी तटकरेंनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. सुनेत्रा पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली. ज्यावेळी ज्या गोष्टी असतील त्यावेळी त्या कळतील, असं त्या म्हणाल्या. त्यामुळे विलिनीकरणात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही, असं तटकरे म्हणाले.

शरद पवारांना भेटणार

राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भेटीचं मला माहीत नाही. शरद पवार हे सहा दशकापासून देश आणि राज्यासाठी समर्पितपणे काम करत आहेत. राज्य आणि देशात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे रुबी रुग्णालयात असताना पंतप्रधान मोदींनी त्यांची चौकशी केली. 2015 मध्ये त्यांचा अमृत महोत्सव झाला. तेव्हा त्यांच्यासाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते एकत्र आले. त्यामुळे अशा नेत्याची तब्येत ठिक नसते तेव्हा ब्रीच कँडीतून आल्यावर त्यांना भेटायला जाणं हे स्वाभाविक आहे. पवारांनीच आम्हाला घडवलं आहे. आम्ही अजितदादांच्या नेतृत्त्वात एनडीएसोबत गेलो. तो एक राजकीय विचार असू शकतो. पण शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला जाणं गैर नाही. मीही मुंबईत असल्यावर त्यांना भेटायला जाईल, असं ते म्हणाले.

Follow Us
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल
मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांचा
Sanjay Raut : मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांचा खोचक टोला; नेमकं काय म्हणाले?
महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...;
Ajit Pawar : महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...; अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा, विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान नवा राजकीय ट्विस्ट
आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील...
Government Schools : आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील 51 शासकीय संस्थांच्या नामकरणाचा मोठा निर्णय
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात....
Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासणी; चिंता करण्याचं कारण नसल्याची माहिती
भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा....
Sushma Andhare On Dhananjay Munde : भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा; परळीतील विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा
Harbour Line : हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा आक्षेप, रेल्वे प्रशासनावर आरोप
मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती....
Jagdeep Dhankhar Health Update : मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती बिघडल्याने AIIMS रुग्णालयात दाखल, डॉक्टरांची विशेष टीम तैनात