Thackeray Brothers : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधू आक्रमक; मुंबईत भव्य मोर्चा काढणार, कसा असेल मार्ग?

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात वातावरण तापलं आहे. ठाकरे बंधू ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात भव्य मोर्चा काढणार आहेत.

Thackeray Brothers : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधू आक्रमक; मुंबईत भव्य मोर्चा काढणार, कसा असेल मार्ग?
Thackeray brothers
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 29, 2026 | 11:25 AM

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या देशभरातील विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगातील कथित दुफळीवरून विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. मनमानी पद्धतीने कारभार करण्याचा आरोप असलेल्या ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंनी दंड थोपाटले आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 4 ऑक्टोबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केलं आहे. आता या महामोर्चाचा मार्ग कसा असेल, याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दोन आयुक्तांनी मनमानी कारभारावर आक्षेप घेतल्याचा दावा एका वृत्तातून समोर आलं. त्यानंतर विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन केलं. त्यानंतर आता ठाकरे बंधू 4 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढणार आहे. ठाकरेंच्या मोर्चासाठी अनेक मार्गांची चाचपणी सुरू आहे.  ठाकरे बंधूंकडून ४ ऑक्टोबरच्या मोर्चासाठी दोन मार्गांची चाचपणी सुरू आहे. ते आता भायखळा ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्याच्या विचारात आहे.

Loading...

भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीकडून मोर्चाची सुरुवात करून BMC मुख्यालयाच्या समोर मोर्चाचा शेवट करण्याचा विचार आहे.  काल या मार्गाची ठाकरेंच्या नेत्यांनी पाहणी केलीय.  याशिवाय मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या मार्गाचाही विचार केला जात आहे.  सोबतच गिरगांव चौपाटी ते आझाद मैदानाचा देखील दोन्ही पक्षाकडून विचार केला जात आहे.  आज या संदर्भात ठाकरे बंधू एकत्रित पत्रकार परिषद घेत घोषणा करणार आहेत.

तत्पूर्वी, सीजेपी आंदोलनादरम्यान ठाकरे बंधू एकत्र आले होते. दादरमधील शिवाजी पार्कमधील मोर्चामध्ये दोन्ही बंधू एकत्र आले होते. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जेन-झी उपस्थित होते. या मोर्चामधून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. या मोर्चामध्ये नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. त्यानंतर आता ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील मोर्चासाठी ठाकरे बंधूं एकत्र येणार आहेत. हा मोर्चा कसा असणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us