
पाकिस्तानकडुन होणाऱ्या दहशतवादी हल्ले होत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया चषकात पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी भारतीय संघ पाठवल्याने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता याच संदर्भात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर बीसीसीआयची भूमिका आणि राष्ट्रीय हितसंबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
दशकात आपल्या देशाला आणि नागरिकांना पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना वारंवार तोंड द्यावे लागले आहे. अलीकडेच माननीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून ‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही’ असे म्हटले असतानाही, दुर्दैवाने, बीसीसीआय आशिया कपमध्ये पाकिस्तानशी खेळण्यासाठी एक संघ पाठवत आहे. या कृतीमुळे असा प्रश्न निर्माण होतो की, बीसीसीआय राष्ट्रीय हितापेक्षा आणि आपल्या जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.
भूतकाळात अनेक राष्ट्रांनी मानवतेच्या भल्यासाठी खेळांमध्ये सहभाग घेतला नाही. दहशतवाद हा एक असाच मुद्दा आहे जो दोन्ही देशांना शांततेत प्रगती करू देत नाही. तरीही, केवळ पैशाच्या आणि जाहिरातींच्या हव्यासापायी बीसीसीआय आपल्या जवानांचे बलिदान आणि जीवन नगण्य मानते, असा आरोपही या पत्राद्वारे केला आहे. आम्ही जगाला शिष्टमंडळे पाठवून पहलघमच्या मागे पाकिस्तान आहे’ असे सांगितले. आता आम्ही जगाला शिष्टमंडळे पाठवून, आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळत आहोत, याचे समर्थन करणार का? असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले.
“गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशातील नागरिक आणि सैन्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले वारंवार सहन केले आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडली आहे.नुकतेच, माननीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून सांगितले आहे की, आता पाणी आणि रक्त दोन्ही एकत्र वाहू शकत नाहीत. तरीही, दुर्दैवाने आणि निर्लज्जपणे, बीसीसीआय (BCCI) आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी एक संघ पाठवत आहे. बीसीसीआयचे हे पाऊल राष्ट्रीय हितासाठी योग्य आहे का? हे पहलगाममध्ये हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या जवानांच्या बलिदानापेक्षा मोठे आहे का?
गेल्या अनेक वर्षांत, अनेक खेळाडू मानवाधिकारांचा भंग होत असल्याच्या कारणावरून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यास नकार देत आहेत. दहशतवाद हे असेच एक कारण आहे जे शांततेने प्रगती होऊ देत नाही. तरीही, केवळ बीसीसीआयच्या हट्टामुळे, पैशाच्या लोभापायी, आपल्या जवानांच्या बलिदानाला कमी लेखले जात आहे. आम्ही जगभरातील देशांमध्ये शिष्टमंडळे पाठवून पाकिस्तानची दहशतवादी बाजू उघड करत आहोत. आता आपण त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत असल्याबद्दल जगभरात आपली बाजू कशी योग्य ठरवणार?
पाकिस्तानने भारतातील खेळाडूंना वारंवार धमक्या दिलेल्या असताना, बीसीसीआयने केवळ स्वतःच्या फायद्यासाठी पाकिस्तानसोबत सामने खेळणे ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. मला आशा आहे की, जरी आपण राजकारणात वेगवेगळ्या बाजूने असलो तरी, या विचारावर आपण एकत्र येऊ. ज्याप्रमाणे आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ साठी आपल्या माननीय पंतप्रधानांना पाठिंबा दिला होता, त्याचप्रमाणे आपण या प्रश्नावरही एकत्रितपणे पुढे जाऊ”, असे आदित्य ठाकरेंनी या पत्रात नमूद केले आहे.