एकाच दिवसात चार पक्षांना खिंडार, कोणत्या पक्षातील पदाधिकारी फुटले?, सर्वांचा विश्वास फक्त…

| Updated on: Jan 05, 2024 | 9:37 AM

Latest Marathi News : निवडणुका काही दिवसांवर आहेत. अशात राजकीय नेते पक्षांवर करत आहेत. एकाच दिवसात 4 पक्षातील नेत्यांचं पक्षांतर केलंय. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. आदित्य यांच्या वरळी मतदारसंघातील नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वाचा सविस्तर बातमी...

एकाच दिवसात चार पक्षांना खिंडार, कोणत्या पक्षातील पदाधिकारी फुटले?, सर्वांचा विश्वास फक्त...
Follow us on

अविनाश माने, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, ठाणे | 05 जानेवारी 2024 : राजकारणात कधी का घडले आणि कोण कुठल्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही… असंच सध्या राज्याच्या राजकारणात घडतंय. महाराष्ट्रातील चार मोठ्या पक्षांना एकाच दिवसात खिंडार पडलंय. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे, मनसेच्या नेत्यांनी पक्षाला रामराम केलाय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे पक्ष प्रवेश झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी हे पक्षप्रवेश झाले.

निवडणुका अगदी काही महिन्यावर आहेत. अशातच आता मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होताना दिसत आहे. पालघर जिल्ह्यातील मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

आदित्य ठाकरेंना धक्का

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासाठीही मोठा धक्का आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेविका रत्ना महाले यांनी पक्षाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला. महाले यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील यावेळी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षात आलेल्या नेत्यांचं स्वागत केलं. आज अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. वरळी आणि पालघरमधून अनेक जणांनी प्रवेश केला आहे. तुम्ही जो विश्वास दाखवला आहे. तो मी पूर्ण करेन. आम्ही जो विकास केला त्यामुळे. तुम्ही आज प्रवेश केला आहे.सगळ्यांना रोजगार आणि हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही काम करत आहे. आपण सगळेही जनतेच्या हिताचे निर्णय घ्याल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

भिवंडीत वेगळं चित्र

तर भिवंडीत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. भिवंडीतील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने राष्ट्रवादीच प्रवेश केलाय. भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शिर्डीत राष्ट्रवादीचं शिबीर पार पडलं. या शिबिरात शरद पवार यांच्या उपस्थितीत म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सुरेश म्हात्रे यांची भिवंडी लोकसभा प्रभारी पदी नियुक्तीने भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार असल्याच्या या राजकीय चर्चांना उधाण आहे.