CCTV Video : कल्याणमध्ये हजार रुपयांवरून झालेल्या वादातून गॅरेज मेकॅनिकवर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Jun 03, 2022 | 8:37 PM

काही दिवसांपूर्वी काम करत असलेल्या गॅरेजमधील एक गाडी घेवून हसन बाजूच्या या वॉशिंग सेंटरमध्ये गेला. हसनने गाडी धुण्यासाठी उभी केली मात्र याच वेळी सागर माळवे हा तिथे आला व त्याने तुमच्याकडे आधीचे एक हजार रुपये बाकी आहेत ते आधी दे असं हसनला सांगितलं. हसनने माझा मालक पैसे देईल असे सांगितले.

CCTV Video : कल्याणमध्ये हजार रुपयांवरून झालेल्या वादातून गॅरेज मेकॅनिकवर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याणमध्ये हजार रुपयांवरून झालेल्या वादातून गॅरेज मेकॅनिकवर जीवघेणा हल्ला
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : हजार रुपयांच्या वादातून एका गॅरेज मेकॅनिक (Garage Mechanic)वर चाकूने हल्ला (Attack) करत त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेत घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत. सागर माळवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हसन खोत असे जखमी कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्यावर मुंबई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आधीच्या कामाचे हजार रुपये देण्याची आरोपींनी केली मागणी

कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात असलेल्या एका गॅरेजमध्ये हसन खोत हा तरुण मेकॅनिक म्हणून काम करतो. या गॅरेजच्या शेजारी गाड्यांचे वॉशिंग सेंटर आहे. काही दिवसांपूर्वी काम करत असलेल्या गॅरेजमधील एक गाडी घेवून हसन बाजूच्या या वॉशिंग सेंटरमध्ये गेला. हसनने गाडी धुण्यासाठी उभी केली मात्र याच वेळी सागर माळवे हा तिथे आला व त्याने तुमच्याकडे आधीचे एक हजार रुपये बाकी आहेत ते आधी दे असं हसनला सांगितलं. हसनने माझा मालक पैसे देईल असे सांगितले.

हजार रुपयांवरुन झालेल्या वादाचे हल्ल्यात रुपांतर

मात्र याच दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून संतापलेल्या सागर व त्याच्या दोन साथीदारांनी हसनला बेदम मारहाण केली. तर सागरने हसनवर चाकूने हल्ला केला. हसन या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात सागर माळवे व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सागर माळवे याला अटक केली आहे. मारहाण करणारे त्याचे दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (Attack on garage mechanic over a dispute over a thousand rupees in Kalyan)