Bhiwandi Building Collpased | भिवंडीत इमारत दुर्घटना, बचावकार्य सुरु

| Updated on: Sep 03, 2023 | 2:44 AM

Bhiwandi Building Collpased marathi news | बिल्डिंग दुर्घटना झाल्याने आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आपत्कालिन यंत्रणाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य करत आहेत.

Bhiwandi Building Collpased | भिवंडीत इमारत दुर्घटना, बचावकार्य सुरु
Follow us on

भिवंडी | मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात तळमजला अधिक दोन मजली (G+2) इमारतीचा भाग कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटननेत आतापर्यंत 6 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. तर ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र सुदैवाने मृत्यू झाल्याचं वृत्त नाही.  दुर्घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आता युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. तसेच जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नक्की काय झालं?

धोबी तलाव स्टेडियमजवळ गौरीपाडा, साहील हॉटेल परिसरात, दर्गा रोड इथे 3 सप्टेंबर रात्री 12 वाजून 35 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. या इमारतीचा मागील भाग कोसळला. ही इमारत 40 वर्ष जुनी असून धोकादायक असल्याची माहिती आहे. रहिवासी इमारत असल्याने ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाचे जवान उपस्थित आहेत. तसेच अग्निशमन दलाच्या मदतीसाठी टीडीआरएफ अर्थात  ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान रवाना झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.