AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC News : तू मला काय देशील? महिला कर्मचाऱ्याकडे नको ती मागणी, कल्याण-डोंबिवली महापालिकेतला धक्कादायक प्रकार उघड

KDMC News : रात्री आठच्या सुमारास महिला कर्मचाऱ्याला व्हॉट्स अप कॉल केला. त्याने माझ्याशी सेटलमेंट केलीय. तू मला काय देशील?. त्यावेळी महिलेने चॉकलेट देईन असं सांगितलं. ही घटना निवडणुकीच्या काळात घडली होती.

KDMC News : तू मला काय देशील? महिला कर्मचाऱ्याकडे नको ती मागणी, कल्याण-डोंबिवली महापालिकेतला धक्कादायक प्रकार उघड
physical relation at office
| Updated on: Apr 03, 2026 | 2:11 PM
Share

काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत एक धक्कादायक प्रकार उघड झाला. ‘सेटलमेंट’च्या नावाखाली एका महिला कर्मचाऱ्याकडे वरिष्ठाने शरीरसुखाची मागणी केली होती. डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलातील वरिष्ठ लिपिक भूषण पाटीलवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पालिकेने त्याच्यावर कारवाई केली आहे. वरिष्ठांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने अखेर महिला कर्मचाऱ्याने मानपाडा पोलीस ठाण्यात भूषण पाटील विरोधात तक्रार नोंदवली होती. या घटनेने KDMC मधील महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई का केली? असा संतप्त महिला कर्मचाऱ्यांनी सवाल विचारला आहे. नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देत भूषण पाटीलने या महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पालिकेने भूषण पाटीलवर निलंबनाची कारवाई केली आहे. ही घटना निवडणुकीच्या काळात घडली होती. राज्यातील अन्य महापालिकांप्रमाणे 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी झाली. पीडित महिलेकडे सावित्रीबाई फुले कलामंदिरात उघडलेल्या एक खिडकी योजनेच्या ठिकाणी आवक-जावक रजिस्टर भरण्याचं काम दिलं होतं. 17 जानेवारीला भूषण पाटील आणि पीडित महिला कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी भूषण पाटील तिला भरपूर बडबडला होता.

तू मला काय देशील?

त्यानंतर तीन दिवसांनी 20 जानेवारीला भूषण पाटीलने रात्री आठच्या सुमारास पीडित महिला कर्मचाऱ्याला व्हॉट्स अप कॉल केला. त्यावेळी भूषण पाटील पीडित महिलेला बोलला की, तुझ्याबरोबर अजून एकाला कामावरुन काढून टाकण्याचे वरिष्ठांनी मला आदेश दिले आहेत. त्याने माझ्याशी सेटलमेंट केलीय. तू मला काय देशील?. त्यावेळी महिलेने चॉकलेट देईन असं सांगितलं. त्यावर भूषण पाटीलने तिच्याकडे मला तुझ्याकडून शरीरसुख हवय अशी मागणी केली. त्यानंतर तिने हा प्रकार आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातला. पण काहीच कारवाई होत नसल्याने अखेर तिने मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं. तिथे गुन्हा दाखल झाल्यानंतर केडीएमसीने भूषण पाटीलला निलंबित केलं.

Follow Us
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत