Video : टोमॅटो विक्रीवरून दोघा विक्रेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Jun 26, 2022 | 4:30 PM

आरोपी अविनाश गुप्ता आणि उमेश सोनकर दोघेही विठ्ठलवाडी पूर्वेकडील रेल्वे स्टेशन समोरील मुख्य रस्त्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी सायंकाळच्या सुमारास अविनाश हा टोमॅटो विक्री करत होता. त्यावेळी उमेश सोनकर याने अविनाशला ‘तू टोमॅटो विक्री करून नको’ तू केवळ भाजी विक्री कर, असे सांगून वाद घातला. बघता बघता हा वाद विकोपाला गेला.

Video : टोमॅटो विक्रीवरून दोघा विक्रेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
टोमॅटो विक्रीवरून दोघा विक्रेत्यांमध्ये फ्री स्टाईल तुफान हाणामारी
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : टोमॅटो विक्रीवरून दोघा विक्रेत्यांमध्ये फ्री स्टाईल तुफान हाणामारी (Fighting) झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. ही घटना कोळसेवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावर घडली आहे. टोमॅटो विक्री (Tomato Sale)वरुन झालेल्या किरकोळ वादाचे मारामारीत रुपांतर झाले. याप्रकरणी दोघा विक्रेत्यांनी परस्पर विरोधात कोळसेवाडी पोलीस (Kolasewadi Police) ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे. विशेष म्हणजे फ्री स्टाईल तुफान हाणामारी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उमेश सोनकर, कैलास सोनकर, अविनाश गुप्ता असे गुन्हा दाखल झालेल्या भाजी विक्री करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

मारहाणीत तिघेही गंभीर जखमी

आरोपी अविनाश गुप्ता आणि उमेश सोनकर दोघेही विठ्ठलवाडी पूर्वेकडील रेल्वे स्टेशन समोरील मुख्य रस्त्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी सायंकाळच्या सुमारास अविनाश हा टोमॅटो विक्री करत होता. त्यावेळी उमेश सोनकर याने अविनाशला ‘तू टोमॅटो विक्री करून नको’ तू केवळ भाजी विक्री कर, असे सांगून वाद घातला. बघता बघता हा वाद विकोपाला गेला. याच वादातून दोघांमध्ये शिवीगाळ होऊन हाणामारी सुरु होती. त्यावेळी उमेशचा भाऊ कैलासही या दोघांच्या भांडणात पडला. त्यानंतर तिघांमध्ये फ्री स्टाईल तुफान हाणामारी झाली. या हाणामारी वेळी दोन्ही गटांकडून लोखंडी वजन काटा एकमेकांच्या डोक्यात मारण्यात आला. या मारहाणीत दोघांनाही दुखापत झाली. तसेच भाजी कापण्याच्या चाकूचा वापरही मारहाणी वेळी करण्यात आला.

20 मिनिटे सुरु होती फ्री स्टाईल मारामारी

फ्री स्टाईल हाणामारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच 20 मिनिट सुरु होती. त्यामुळे परिसरात एकच पळापळ झाली होती. या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अविनाश व कैलास या दोघांनीही पसरस्पर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (Freestyle fighting between two vendors over tomato sales, video goes viral on social media)