Married | 32 वर्षाच्या तरूणाचे 12 मुलींशी लग्न, चौकशीतील खुलासा ऐकून पोलिसही चक्रावले!

माहितीनुसार, किशनगंज जिल्ह्यातील कोचाधामन पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आतापर्यंत 12 लग्न केले आहेत. अल्पवयीन मुलींशी लग्न करून लग्नानंतर मुलींना वेश्याव्यवसायात ढकलायचा. याप्रकरणी अनगड पोलिसांनी त्याला अटक केलीयं. किशनगंज जिल्ह्यातील बहादूरगंज पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या कोईडांगी गावातून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Married | 32 वर्षाच्या तरूणाचे 12 मुलींशी लग्न, चौकशीतील खुलासा ऐकून पोलिसही चक्रावले!
Image Credit source: istockphoto.com
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 26, 2022 | 2:21 PM

बिहारच्या (Bihar) पूर्णिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं. वयाच्या 32 व्या वर्षी 12 मुलींशी लग्न करणाऱ्या एका नराधमाला पोलिसांनी अटक केलीयं. अटक करण्यात आलेला तरुण (Young) हा किशनगंजचा रहिवासी आहे. अल्पवयीन मुलींशी लग्न करून तो त्यांना वेश्याव्यवसायात ढकलायचा. या आरोपीचा शोध पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून घेत होते. आता तो पोलिसांच्या (Police) हाती लागला असून पोलिस त्याची चौकशी करत आहेत. त्याच्याकडून अजून काही गुन्हांची कबुली मिळण्याची शक्यता आहे.

अखेर तरूणाला अनगड पोलिसांनी केली अटक

माहितीनुसार, किशनगंज जिल्ह्यातील कोचाधामन पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आतापर्यंत 12 लग्न केले आहेत. अल्पवयीन मुलींशी लग्न करून लग्नानंतर मुलींना वेश्याव्यवसायात ढकलायचा. याप्रकरणी अनगड पोलिसांनी त्याला अटक केलीयं. किशनगंज जिल्ह्यातील बहादूरगंज पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या कोईडांगी गावातून पोलिसांनी आरोपीला अटक केली. अनगडचे एसएचओ पृथ्वी पासवान यांनी सांगितले की, 8 डिसेंबर 2015 रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता.

हे सुद्धा वाचा

मुलींना लग्नाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलायचा

आरोपी अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळून घेऊन जाऊन वेश्याव्यवसायात टाकायचा. या प्रकरणी पोलिसांनी किशनगंज येथील एलआरपी चौकातून मुलीला ताब्यात घेतले होते, मात्र पोलिसांना चकमा देऊन आरोपी पळून गेला. एसएचओने सांगितले की, आरोपीच्या चौकशीत त्याने सांगितले की त्याने आतापर्यंत 12 लग्न केले आहेत, ज्यामध्ये 8 अल्पवयीन होते. तो स्वतःला सर्व मुलींना अविवाहित असल्याचे सांगून लग्न करून त्यांना वेश्याव्यवसाय करायला लावत होता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें