AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS अधिकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू की हत्या? कार्तिकच्या नातेवाईकांनी केला धक्कादायक खुलासा!

व्हिजिलन्स डीएसपी अजय कुमार यांनी सांगितले की, जे आरोप केले जात आहेत ते सर्व खोटे आणि बिनबुडाचे आहेत. कार्तिकच्या आत्महत्येचे आम्हालाही दु:ख असल्याचेही ते म्हणाले आहेत. डीएसपी अजय कुमार यांनी सांगितले की, संजय पोपलीच्या घरातून मोठ्या प्रमाणात रिकव्हरी करण्यात आली आहे. संजय पोपली यांच्या घरावर छापे टाकून घरातील स्टोअररूममध्ये लपवून ठेवलेले सोने, चांदी आणि मोबाईल जप्त केले.

IAS अधिकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू की हत्या? कार्तिकच्या नातेवाईकांनी केला धक्कादायक खुलासा!
| Updated on: Jun 26, 2022 | 1:25 PM
Share

चंदीगडमध्ये (Chandigarh) आयएएस अधिकारी संजय पोपली यांच्या मुलाच्या मृत्यूचे गूड वाढतांना दिसते आहे. संजय आणि त्यांची पत्नी आपल्या मुलाची हत्या झाल्याचा आरोप करत आहेत, तर दुसरीकडे पंजाब व्हिजिलन्स टीमने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. कार्तिकच्या आत्महत्येशी (Suicide) आमचा काहीही संबंध नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. चंदीगड येथून भ्रष्टाचाराच्या प्रकरणात व्हिजिलन्स पथकाने आयएएस अधिकारी संजय पोपली यांना चंदीगड येथून अटक केली होती. आयएएस अधिकारी संजय पोपली यांच्या घरावर व्हिजिलन्सच्या छापेमारीत त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मात्र, कार्तिक पोपली यांच्या आत्महत्येशी आमचा काहीही संबंध नसल्याचे व्हिजिलन्स विभागाच्या (Vigilance department) अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

व्हिजिलन्स डीएसपी अजय कुमार म्हणाले की…

व्हिजिलन्स डीएसपी अजय कुमार यांनी सांगितले की, जे आरोप केले जात आहेत ते सर्व खोटे आणि बिनबुडाचे आहेत. कार्तिकच्या आत्महत्येचे आम्हालाही दु:ख आहे. डीएसपी अजय कुमार यांनी सांगितले की, संजय पोपलीच्या घरातून मोठ्या प्रमाणात रिकव्हरी करण्यात आली आहे. संजय पोपली यांच्या घरावर छापे टाकून घरातील स्टोअररूममध्ये लपवून ठेवलेले सोने, चांदी आणि मोबाईल जप्त केले. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 12 किलो सोन्याचा समावेश असून त्यात 9 सोन्याच्या विटा, 49 सोन्याची बिस्किटे आणि 12 सोन्याची नाणी आहेत, तर 3 किलो चांदीमध्ये 3 चांदीच्या विटा आणि 18 चांदीच्या नाण्यांचा समावेश आहे. याशिवाय चार नवीन आयफोन, सॅमसंग कोल्ड फोन देखील आहेत.

IAS अधिकारी संजय पोपली यांचा गंभीर आरोप

IAS अधिकारी संजय यांनी व्हिजिलन्स पथकावर आरोप केला आहे की, अधिकाऱ्यांनीच माझ्या मुलाची हत्या केली आहे. याचा मी साक्षीदार आहे. त्याचवेळी कार्तिक पोपलीच्या आईने सांगितले की, त्यांनी माझ्या मुलाचा छळ केला आणि त्याची हत्या केली. मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली व्हिजिलन्स ब्युरो आणि डीएसपी लोकांची हत्या करत आहेत.कार्तिक पोपलीची हत्या केल्याचा आरोप संजय पोपली यांच्या नातेवाईक अनु प्रीत कुलार यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, पथकाने संजय पोपली यांना काहीतरी सही करण्यास सांगितले आणि जर त्यांनी तसे केले नाही तर ते त्यांच्या मुलासाठी चांगले होणार नाही. त्यांनी अधिकाऱ्याला एका खोलीत बंद करून मुलाला वरच्या मजल्यावर नेले. आम्ही खाली उभे होतो आणि काही वेळाने आम्हाला गोळ्यांचा आवाज ऐकू आला. व्हिजिलन्स पथकानेच त्याची हत्या केलीयं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?