AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Merger : दादा गेल्यानंतर… दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, यासंदर्भात आपल्याकडे आतापर्यंत कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्या आज माध्यमांशी बोलत होत्या. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

NCP Merger : दादा गेल्यानंतर... दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया
supriya sule on ncp mergerImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 7:05 PM
Share

दादा गेल्यानंतर दोन्ही पक्षांच्या विलिनीकरण्यासाठी माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अशी मोठी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. दादा असताना त्याने विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरु केलेले, यावर आपण यापूर्वीही बोललो आहोत. पण अजित दादा गेल्यानंतर आतापर्यंत माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

माझ्याकडे कोणताच प्रस्ताव आलेला नाही. माझ्याशी कोणी बोललेले नाही. पवार साहेबांना अनेक लोक भेटत असतात. त्यामुळे त्यामध्ये नविन नाही किंवा वावगे काहीही नाही, अजित पवारांचा गट वेगळा झाला तेव्हाही अनेक लोक पवार साहेंबांना भेटायचे, असं खासदार सुळे म्हणाल्या आहेत. त्यांच्या पक्षामध्ये काय सुरु आहे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत पक्ष आहे. आपण कशाला झाकायचे त्यांच्या पक्षात, असंही सुळे म्हणाल्या.

ज्या दिवशी माझा भाऊ गेला. त्यानंतर मी यावर पडदा टाकला. माझा भाऊ गेला तेव्हाच विषय संपला. दादा होते तोवर चर्चा होती. दुनियेला माहित होते, आम्ही काय करणार ते. माझा भाऊ गेला विषय संपला, अशी मोठी प्रतिक्रिया सुळेंनी यावेळी दिली आहे. त्यामुळे आता विलिनीकरणाच्या या सर्व चर्चांमध्ये सुप्रिया सुळेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

बातमी अपडेट होते आहे…

Follow Us
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'
लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
Mumbai Local case : लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या...
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या निर्णयावरून नवा वाद!
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर