Manoj Jarange Patil: मराठा बांधवांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी, मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा, तरुणांना केलं मोठं आवाहन
मराठा समाजाच्या प्रगतीसाठी, लेकरा बाळांचे भविष्यासाठी आणि एकजूट टिकून राहण्यासाठी आपण मराठा सेवक म्हणून काम करायचे आहे," असंही मनोज जरांगे पाटील यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil Helpline Numbar: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरागे पाटील यांनी राज्यातील मराठा आणि कुणबी सेवकांसाठी हेल्पलाईन नंबर आज जारी केला आहे. मराठा समाजातील मुलांच्या भविष्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात घर तिथे मराठा सेवक तयार झाला पाहिजे, याच उद्देशाने हा नंबर आपण दिलेला आहे. असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील?
“आपण दसऱ्याच्या दिवशी मराठा समाजासाठी सांगितलं होतं की, प्रचंड मोठ्या समाजाच्या हितासाठी आणि समाजातील मुलांच्या भविष्यासाठी लढणारी टीम राज्याच्या कानाकोपऱ्यात घर तिथे मराठा सेवक झाला पाहिजे यासाठी आपण घोषणा केली होती आणि नंबर देऊ म्हटलं होते. त्या दृष्टीने आज आपण मराठा समाजातील सर्वच लोकांसाठी हा नंबर दिलेला आहे,” असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
“याचा उद्देश एकच आहे, ज्यांना ज्यांना मराठा समाज सेवक व्हायचं आहे त्यांना सर्वात आधी समाज प्रथम पाहिजे आणि राजकारण नंतर असले पाहिजे. दुसरा मुद्दा असा पाहिजे की मराठा समाजाच्या प्रगतीसाठी, लेकरा बाळांचे भविष्यासाठी आणि एकजूट टिकून राहण्यासाठी आपण मराठा सेवक म्हणून काम करायचे आहे,” असंही मनोज जरांगे पाटील यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे.
हेल्पलाईन नंबर कशासाठी? मनोज जरांगेंनी सांगितलं!
“मराठा समाजाच्या हितासाठी आणि लेकरा बाळांच्या कल्याणासाठी जिथे जिथे उपोषण आणि सभा असतील त्या त्या ठिकाणी मराठा सेवकांनी मराठा समाजाला जागृत करून एकत्र येणे गरजेचे आहे. कितीही संकट आलं तरी स्वार्थ व्हायचं नाही इमानदारीने मराठा समाजासाठी प्रत्येकाने काम करायचं आहे. 9421292222 हा नंबर जारी करण्यात आला असून यावर प्रत्येकाने आपले नाव, पूर्ण पत्ता आणि तुम्ही काय कार्य करता हे टाकावं मात्र फोन कुणीही करू नये,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केली आहे.
