कल्याणच्या आडीवली ढोकळीत पाणी प्रश्न सुटल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

| Updated on: May 08, 2021 | 11:07 PM

कल्याण ग्रामीण परिसरात अमृत योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे (KDMC former corporator Kunal Patil)

कल्याणच्या आडीवली ढोकळीत पाणी प्रश्न सुटल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
Follow us on

कल्याण (ठाणे) : कल्याण ग्रामीण परिसरात अमृत योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावात पाणी प्रश्न उद्भवत होता. माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील (KDMC former corporator Kunal Patil) यांच्या प्रयत्नांनी अखेर पाण्याचा प्रश्न गावात लवकरच सुटणार, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कल्याण ग्रामीणमधील 27 गावे हे नेहमी चर्चेचा विषय ठरली आहेत. एकेकाळी ही गावे महापालिकेतून वगळण्यात आली. विकास होत नाही म्हणून गावकऱ्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. नंतर ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. 27 गावात अनेक समस्या आहेत. अवैध बांधकाणो, कचरा, रस्त्यांची दुरावस्था आहे. सगळ्यात मोठी पाणी समस्या आहे. यासाठी अनेक लोक प्रतिनिधींना वारंवार पाठपुरावा केला.

आडीवली ढोकळीचे नगरसेवक कुणाल पाटील (KDMC former corporator Kunal Patil) यांचे पाणी प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरु होते. या परिसरात अमृत योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजने अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात होते. तेही पूर्ण झाले आहे. त्यामुळे या परिसरात पाणी पुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी नागरीकांसोबत फेरफटका मारुन आढावा घेतला.

हेही वाचा : माणुसकी मेली, एकीकडे आपलं माणूस गमावल्याचं दु:ख, दुसरीकडे खासगी रुग्णावाहिका चालकांकडून लुटमार