Ulhasnagar Crime : उल्हासनगरात टँकर चालकांकडून ऑईलची चोरी, ढाब्याच्या मालकासह एकूण सात जणांना ठोकल्या बेड्या

| Updated on: Jan 20, 2022 | 10:56 PM

मुंबईच्या ऑईल स्टोरेजमधून कच्चं ऑईल टँकरमध्ये भरून अंबरनाथ एमआयडीसीतल्या व्हॉल्व्होलाईन कंपनीत आणलं जात होतं. तिथे या ऑईलवर प्रक्रिया करून त्यापासून इंजिन ऑईल तयार केलं जायचं. हे ऑईल ज्या टँकर्समधून अंबरनाथला आणलं जात होतं, त्या टँकर्सच्या चालकांनी ऑईल चोरी करण्याचं रॅकेट सुरू केलं होतं.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात टँकर चालकांकडून ऑईलची चोरी, ढाब्याच्या मालकासह एकूण सात जणांना ठोकल्या बेड्या
CRIME
Follow us on

उल्हासनगर : ऑईल टँकर्समधून ऑईलची चोरी करून अपहार करणाऱ्या एका टोळीचा ठाणे खंडणीविरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका ढाब्याच्या मालकासह टँकरवर काम करणाऱ्या एकूण 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिवबुरन वर्मा, अमन सरोजा, संजय सिंग, प्रयाग सिंग, अमर वर्मा, संदीप वर्मा, अनिल चंद्रकांत चिकणकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी चंद्रकांत चिकणकर हा एका ढाब्याचा मालक आहे. (Oil theft from tanker drivers in Ulhasnagar, Police arrested seven people)

टँकरमधून ऑईल चोरी करुन विकायचे

मुंबईच्या ऑईल स्टोरेजमधून कच्चं ऑईल टँकरमध्ये भरून अंबरनाथ एमआयडीसीतल्या व्हॉल्व्होलाईन कंपनीत आणलं जात होतं. तिथे या ऑईलवर प्रक्रिया करून त्यापासून इंजिन ऑईल तयार केलं जायचं. हे ऑईल ज्या टँकर्समधून अंबरनाथला आणलं जात होतं, त्या टँकर्सच्या चालकांनी ऑईल चोरी करण्याचं रॅकेट सुरू केलं होतं. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खोणी तळोजा महामार्गावर विसावा ढाबा आहे. या ढाब्यावर हे टँकरचालक रात्रीच्या वेळी थांबायचे. तिथे टँकरचं सील तोडून प्रत्येक टँकरमधून 50 ते 60 लिटर ऑईल काढून घेतलं जायचं. हे ऑईल विसावा ढाब्याच्या मागे असलेल्या एका मोठ्या टाकीत साठवलं जात होतं आणि नंतर त्याची विक्री केली जात होती.

सर्व आरोपींना न्यायालयाने 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

या प्रकरणाची माहिती मिळताच ठाणे खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी या ढाब्यावर धाड टाकली. यावेळी तिथे ऑईलची चोरी सुरू असल्याचं उघड झालं. यावेळी पोलिसांनी शिवबुरन वर्मा, अमन सरोजा, संजय सिंग, प्रयाग सिंग, अमर वर्मा, संदीप वर्मा या टँकरवर काम करणाऱ्या 6 जणांना बेड्या ठोकल्या. हे सगळे शिवडी कोळसा बंदर परिसरात राहणारे असून मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. तर त्यांच्या या चोरीत मलंगगड परिसरात राहणारा विसावा ढाब्याचा मालक अनिल चंद्रकांत चिकणकर याचा सुद्धा सहभाग आढळून आल्यानं त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या सर्वांना आज उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Oil theft from tanker drivers in Ulhasnagar, Police arrested seven people)

इतर बातम्या

Dhule Rada : धुळ्यात नगरपंचायत निवडणुकीनंतर दोन गटात राडा, एका महिलेचा मृत्यू, नागरिकांचे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

Muktainagar : मुक्ताईनगरमध्ये क्षुल्लक कारणावरुन ऑन ड्युटी वनरक्षकाला मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल