Muktainagar : मुक्ताईनगरमध्ये क्षुल्लक कारणावरुन ऑन ड्युटी वनरक्षकाला मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

Muktainagar : मुक्ताईनगरमध्ये क्षुल्लक कारणावरुन ऑन ड्युटी वनरक्षकाला मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
मुक्ताईनगरमध्ये क्षुल्लक कारणावरुन ऑन ड्युटी वनरक्षकाला मारहाण

संशयित आरोपी रहीम पवार हा डुकरांना मारण्याकरीता ठेवलेले गोळे घेऊन परत येत होता. यावेळी वनरक्षक ज्ञानोबा मोहनराव धुळगंडे यांनी त्यास अडवले. तसेच वन्य प्राण्यांना मारण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे सांगत धुळगंडे यांनी आरोपीची समजूत काढली.

रवी गोरे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 20, 2022 | 9:44 PM

जळगाव : साताऱ्यानंतर आता जळगावमध्ये वनरक्षकाला मारहाण करण्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर वनक्षेत्र वडोदा वनपरिक्षेत्रात ड्युटी करीत असताना एका वन रक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात याबाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिस रवाना झाले आहेत. ज्ञानोबा मोहनराव धुळगंडे असे मारहाण करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. तर रहिम पवार असे आरोपीचे नाव आहे. (On-duty forest ranger beaten for trivial reasons in Muktainagar)

आरोपीने वनरक्षकाला धक्काबुक्की करीत दगडाने मारले

संशयित आरोपी रहीम पवार हा डुकरांना मारण्याकरीता ठेवलेले गोळे घेऊन परत येत होता. यावेळी वनरक्षक ज्ञानोबा मोहनराव धुळगंडे यांनी त्यास अडवले. तसेच वन्य प्राण्यांना मारण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे सांगत धुळगंडे यांनी आरोपीची समजूत काढली. मात्र रहीम पवार यास त्या गोष्टीचा राग आल्याने त्याने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून वनरक्षक ज्ञानोबा धुळगंडे यांना धक्काबुक्की केली. इतकेच नाही तर जमिनीवरील दगड उचलून त्यांच्या हातावर मारून दुखापत केली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कलम 353, 332, 337 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्याकरीता पोलिस रवाना झाले आहेत.

काल साताऱ्यातही वनरक्षक दाम्पत्याला झाली होती मारहाण

क्षुल्लक कारणावरुन माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीने वनरक्षक दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना काल साताऱ्यात घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करण्यात आलेली वनरक्षक महिला गरोदर असून तिच्या पोटात लाथा मारत डोक्यावर दगड मारला. संबंधित माजी सरपंच हा वन समितीचा अध्यक्ष आहे. वनरक्षक दाम्पत्याने आरोपीला न विचारता मजुर दुसऱ्या ठिकाणी नेले म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहणीत गरोदर वनरक्षक महिला जखमी झाली. सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे अशी मारहाण करण्यात आलेल्या वनरक्षक दाम्पत्याची नावे आहेत. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. सातारा तालुका पोलिसांनी दोन पथके तयार करुन आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. (On-duty forest ranger beaten for trivial reasons in Muktainagar)

इतर बातम्या

Pimpari-Chinchwad Crime : मध्य प्रदेशच्या अट्टल दरोडेखोरांसोबत पिंपरी-चिंचवड पोलिसांची झटापट, एक पोलीस जखमी

Indapur : इंदापूर भिशी फसवणूक प्रकरणात अखेर गुन्हा दाखल, दोघांना ताब्यात घेतले

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें