डोक्यावर पाऊस, हातात झेंडे, लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाच्या घोषणा, पुढचं आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा

| Updated on: Jun 10, 2021 | 4:49 PM

नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज कल्याण-डोंबिवलीत ठिकठिकाणी भूमीपुत्रांनी साखळी आंदोलन केलं (People agitation for to name Navi Mumbai airport as D B Patil).

डोक्यावर पाऊस, हातात झेंडे, लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाच्या घोषणा, पुढचं आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा
आता शांततेत आंदोलन करतोय, पुढच्यावेळी संयम ठेवला जाणार नाही, कल्याण-डोंबिवलीतील आंदोलकांचा इशाला
Follow us on

कल्याण (ठाणे) : नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज कल्याण-डोंबिवलीत ठिकठिकाणी भूमीपुत्रांनी साखळी आंदोलन केलं. विशेष म्हणजे मागणी मान्य झाली नाही तर पुढच्यावेळी संयम ठेवला जाणार नाही, अशा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. कल्याण डोंबवीलत अनेक भागांमध्ये हे आंदोलन बघायला मिळालं. अत्यंत संयमाने, एका रांगेत एकाच ठिकाणी भली मोठी रांग करुन भूमीपुत्रांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या आंदोलनात लोकप्रतिनिधी देखील सहभागी झाले होते (People agitation for to name Navi Mumbai airport as D B Patil).

कल्याणमध्ये अनेक ठिकाणी आंदोलन

कल्याण पूर्व भागातील तीसगाव नाका, चक्कीनाका, नेवाली नाका, आडीवली ढोकली, द्वारली, भाल, काटई, मानपाडा, भोपर, शीळ फाटा या ठिकाणी भूमीपूत्र रस्त्यावर उतरले होते. त्यात महिला ही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सगळेच भूमीपूत्र हे आग्रही आहेत. आंदोलनात ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाचे लोकही सहभागी झाले होते (People agitation for to name Navi Mumbai airport as D B Patil).

भाजप आमदार गणपत गायकवाडही आंदोलनात सहभागी

विशेष म्हणजे भाजप आमदार गणपत गायकवाड हे देखील मानवी साखळीत सहभागी झाले होते. “विमानतळास दि. बा. पाटील याचे नावे देण्याची मागणी रास्त आहे. मात्र हे सरकार मनमानी करीत आहे. शिवसेनेच्या नेत्यांची नावे विविध प्रकल्पांना दिली जात आहे. भूमीपुत्रांचे नेते असलेल्या दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळास द्यावे”, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी दिली.

मनसे आमदार राजू पाटलांचा इशारा

विशेष म्हणजे मनसे आमदार राजू पाटील हे देखील मानवी साखळीत सहभागी झाले. “विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणी संदर्भात सरकारची भेट घेतली होती. मात्र सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. आता मानवी साखळी शांततेत पार पडली असली तरी समाज यापूढील आंदोलनात शांतता आणि संयम ठेवणार नाही”, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

आगरी युथ फोरम देखील आंदोलनात सहभागी

आंदोलनात सहभागी झालेले आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. दि. बा. पाटील यांनी भूमीपुत्रांसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भर पावसात भूमीपूत्र रस्त्यावर उतरला आहे. 24 तारखेला सिडकोत भव्य मोर्चा याच मागणीसाठी आहे. आत्ता समाजाचा संयम सुटण्याआधीच सरकारने समाजाच्या मागणीचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकली या ठिकाणी पार पडलेल्या मानवी साखळीत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील, कल्याण पश्चिमेत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर आणि असंख्य कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी