राज्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता, अंबरनाथमध्ये शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम

| Updated on: Aug 27, 2021 | 2:52 PM

राज्यात शाळा सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये पालिकेच्या वतीने शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत शिक्षकांसाठी तब्बल 750 लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

राज्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता, अंबरनाथमध्ये शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम
Follow us on

ठाणे : राज्यात शाळा सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये पालिकेच्या वतीने शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत शिक्षकांसाठी तब्बल 750 लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर फ्रन्टलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. मात्र यामध्ये शिक्षकांसाठी कुठलीही विशेष मोहीम सुरु करण्यात आलेली नव्हती.

राज्यात येत्या काही काळात शाळा पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जातेय. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचं बनलं होतं. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेने आज शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली.

लसीकरणासाठी शिक्षकांची गर्दी

या मोहिमेत ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रावर शिक्षकांसाठी कोव्हीशिल्ड लसीचे 750 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या लसीकरण मोहिमेला शिक्षकांनी सकाळी 9 वाजल्यापासून गर्दी केली असून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक शिक्षकाची तपासणी करून त्यांना लस दिली जातेय. या लसीकरण मोहिमेनंतर लस घेतलेल्या शिक्षकांनीही समाधान व्यक्त केलं आहे.

सोलापूरमध्ये ठप्प असलेलं लसीकरण आज सुरु

सोलापूर शहरात कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा झाल्याने लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. गेल्या दोन दिवसापासून लसीचा तुटवड्याअभावी लसीकरण मोहीम ठप्प होते. संध्याकाळी लस उपलब्ध झाल्याने आज लसीकरण करण्यात सुरु आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी सकाळपासून प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर हजेरी लावली.

हे ही वाचा :

Side Effects of Kiwi : ‘या’ 5 लोकांनी किवी खाणे टाळावे अन्यथा आरोग्याला हानी पोहचू शकते!

Atal Pension Yojna: दर महिन्याला 210 रुपये गुंतवा आणि म्हातारपणी महिन्याला मिळवा 5 हजारांची पेन्शन