Thane Smart City : राष्ट्रीय स्तरावर ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीचा गौरव, देशातील पहिल्या 10 शहरात समावेश

| Updated on: Jun 17, 2022 | 2:42 PM

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्मार्ट सिटी लि.ने ठाणे महानगरपालिकेच्या अन्य विभागांनी स्मार्ट सिटीज ओपन डेटा पोर्टलवर 70 पेक्षा जास्त डेटासेट अपलोड केले होते, ज्याचा सर्व भागधारक जसे की शैक्षणिक किंवा संशोधन संस्था, खाजगी कंपन्या, किंवा ठाणे शहरातील नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार याचा वापर करण्यास मदत झाली आहे.

Thane Smart City : राष्ट्रीय स्तरावर ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीचा गौरव, देशातील पहिल्या 10 शहरात समावेश
राष्ट्रीय स्तरावर ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीचा गौरव
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : भारत सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “ओपन डेटा सप्ताह” (Open Data Week) स्पर्धेत ठाणे स्मार्ट सिटी (Smart City)चा देशातील 100 शहरांमधून पहिल्या 10 शहरात समावेश झाला असून आज स्मार्ट सिटी मिशनचे सह सचिव आणि मिशन संचालक कुणाल कुमार यांच्या हस्ते ठाणे स्मार्ट सिटीचा गौरव करण्यात आला. सुरत येथील आयोजित समारंभात महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी आज हा गौरव स्वीकारला. (Pride of Thane Municipal Corporation’s Smart City at the national level)

ओपन डेटा सप्ताहाचे आयोजन

केंद्र शासनाने नागरिकांच्या सूचना घेण्यासाठी ओपन डेटा सप्ताह ही स्पर्धा आयोजित केली होती. त्याअनुषंगाने ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमातंर्गत शासनाच्या ओपन डेटा धोरणाला चालना देण्यासाठी ठाणे शहरात या ओपन डेटा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून स्मार्ट सिटी ओपन डेटा पोर्टलला समृद्ध करण्यासाठी स्मार्ट सिटीमार्फत दर्जेदार डेटासेट, डेटास्टोरी, ब्लॉग आणि एपीआय अपलोड करण्यात आले होते.

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्मार्ट सिटी लि.ने ठाणे महानगरपालिकेच्या अन्य विभागांनी स्मार्ट सिटीज ओपन डेटा पोर्टलवर 70 पेक्षा जास्त डेटासेट अपलोड केले होते, ज्याचा सर्व भागधारक जसे की शैक्षणिक किंवा संशोधन संस्था, खाजगी कंपन्या, किंवा ठाणे शहरातील नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार याचा वापर करण्यास मदत झाली आहे. भारत सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत सुरत येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यास मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी स्वरूप कुलकर्णी, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नितीन डुंबरे, स्मार्ट सिटीचे सल्लागार कैलास पाटील,अमोल कुंभार आदी उपस्थित होते. (Pride of Thane Municipal Corporation’s Smart City at the national level)

इतर बातम्या

Satara Crime : साताऱ्यात हनीट्रॅपद्वारे तरुणांना जाळ्यात अडकवून खंडणी मागणाऱ्या जोडप्याचा पर्दाफाश

Chandrapur Tiger Attack : चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 24 तासात दोघांचा मृत्यू