राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेचा मार्ग अखेर मोकळा, नौपाडा परिसरातील गजानन महाराज चौकात होणार सभा

| Updated on: Apr 07, 2022 | 2:57 PM

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यामुळे 9 एप्रिल रोजी राज ठाकरे सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेचा मार्ग अखेर मोकळा, नौपाडा परिसरातील गजानन महाराज चौकात होणार सभा
राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेचा मार्ग अखेर मोकळा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे : राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पोलिसांनी राज ठाकरें (Raj Thackeray)च्या सभेला परवानगी दिली आहे. ठाण्यातील नौपाडा परिसरातील गजानन महाराज चौकात 9 एप्रिल रोजी सायंकाळी राज ठाकरेंची सभा (Sabha) होणार आहे. ठाण्यात जागा आणि मैदाने कमी आहेत. तर दुसरीकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न असल्याने पोलिस परवानगी देत नव्हते. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यामुळे 9 एप्रिल रोजी राज ठाकरे सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Raj Thackerays sabha will be held at Gajanan Maharaj Chowk in Naupada area of Thane)

सभेला परवानगी देण्याबाबत मनसे नेत्यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

दरम्यान, मनसेची सभा होणारच असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला होता. निर्बंध घातले तरी आम्ही सभा घेणारच. टेबलवर उभे करुन राज ठाकरे यांना भाषण करायला लावणार. पण सभा होणारच, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठामपणे सांगितले होते. बाळा नांदगावकर आज ठाण्यात आले होते तेव्हा बोलत होते. सभेला परवानगी देण्याबाबत बाळा नांदगावकर, अविनाश जाधव आणि ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. (Raj Thackerays sabha will be held at Gajanan Maharaj Chowk in Naupada area of Thane)

इतर बातम्या

Video Chhagan Bhujbal on ED | ईडी हा राक्षसी कायदा, अकोल्यात छगन भुजबळ यांनी व्यक्त केली चिंता

MNS: भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेचे मुस्लिम नगरसेवकही अडचणीत, तुम्ही मुस्लिम असूच शकत नाही; संभाषण जसंच्या तसं