Raj Thackeray Thane Uttar Sabha Live: जंतराव, हा संपलेला पक्ष नाही, ‘विझवत’ जाणारा पक्ष, राज ठाकरेंच्या टार्गेटवर जयंत पाटील

| Updated on: Apr 12, 2022 | 9:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष विझलेला पक्ष अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांची नावं घेत जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राजकारणातील बदलणाऱ्या भूमिकांपासून ते अगदी सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यावरही टीका केली.

Raj Thackeray Thane Uttar Sabha Live: जंतराव, हा संपलेला पक्ष नाही, विझवत जाणारा पक्ष, राज ठाकरेंच्या टार्गेटवर जयंत पाटील
जंतराव, हा संपलेला पक्ष नाही, 'विझवत' जाणारा पक्ष, राज ठाकरेंच्या टार्गेटवर जयंत पाटील
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणेः राज ठाकरे यांनी पाडव्यानंतर सभा घेतली, त्यावेळी त्यांनी सांगितले की, राजकारणातील (Politics) अनेक नेत्यांचा समाचार घेत त्यांनी त्यांनी मी सभा का घेतोय मी आज, याचं काय कारण आहे..? असा सवाल करत त्यांनी आपल्या भाषणाला जोरदारपणे सुरुवात केली. यावेळी त्यांनी सांगितले की, पाडव्याची सभा झाल्यानंतर अनेकांनी आपापले तारे तोडले, राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी तारे तोडल्यानंतर मला असं वाटलं की, याचं उत्तर तर दिलं पाहिजे असं सांगत राज ठाकरे (Raj Thackrey) स्टाईलने अनेक प्रश्नांची त्यांनी यावेळी उत्तर दिले. यावेळी त्यांनी सांगितले की, सभा घेतली कारण म्हणजे जर पीसी घेतली असती मी तर या सगळ्या पक्षांना जे बांधिल काही पत्रकार आहेत, तेही त्यात शिरतात आणि ते पत्रकार भलतीकडे भरकटवतात, असं म्हणत त्यांनी राजकारणातील अगदी नरेंद्र मोदींपासून (Narendra Modi) ते महानगरपालिकेच्या राजकारणापर्यंत आपली परखड मतं मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष विझलेला पक्ष अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांची नावं घेत जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राजकारणातील बदलणाऱ्या भूमिकांपासून ते अगदी सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यावरही टीका केली.

निवडूण येणाऱ्या लोकांची टोळी

राष्ट्रवादी पक्ष टीका करताना जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सांगितले की, हा विझलेला पक्ष आहे असं म्हणणाऱ्या जंतराव, हा विझलेला पक्ष नाही विझवणाऱ्यांचा पक्ष आहे असं म्हणत त्यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मराठी भाषा खूप खुबीने वापरत त्यांनी टीका केली. त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, हे काय मला सांगणार, यांचे आमदारांचं काय झालं, त्यांच्या आमदार काय झालं म्हणत निवडूक येणाऱ्या लोकांची टोळी म्हणजे राष्ट्रवादी अशी खरमरीत शब्दात त्यांनी सुनावले. राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांनी या लोकांना एकत्र ठेवलंय आणि त्यांचे दोरी पवारांच्या हाती आहे असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेवरही निशाणा साधला.

मोदींविरोधात बोललो म्हणून मलाही त्रास

राज ठाकरे यांनी यावेळी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत, आता भुजबळ बघा काय म्हणाले म्हणत त्यांनी माझ्यावर टीका केली हे खरं आहे, तर मी मोदींविरोधात बोललो म्हणून मलाही त्रास सहन करावा लागला असेही ते म्हणाले.

सीए आणि गैरव्यवहारांमुळे तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं

तुमचा सीए आणि गैरव्यवहारांमुळे तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं तर मोदींवर टीका केली म्हणून नाही आत जावं लागलं. अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी आमचे शेवटचे लाडके अजित पवार काय म्हणताहेत बघा असे म्हणत त्यांनी केलेली टीका सांगितली, अजित पवार यांचा एक आवडता शब्द आहे पठ्ठ्या, यांना काय म्हणे भोंगे आताच दिसले का, याच्या अगोदर काय झोपा काढत होते का असे का म्हणत त्यांनी अजित पवार कधी, कधी, कुठची कुठची गोष्ट बोललोय ना ते मला नीट आठवतंय, आणि तुमच्या माहितीसाठी मी तीन व्हिडीओ आणले आहेत असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समाचार घेतला.

संबंधित बातम्या

Raj Thackeray Thane News: तर अमेरिकेतून मनसेच्या नगरसेवकाला फोन येतील, वसंत मोरेंनी किती ऑफर धुडाकावल्या?

Raj Thackeray Thane News: आमचा साईनाथ त्यावेळेस, ज्या नेत्यामुळे राज ठाकरेंनी हटवलं, त्याच्यावर वसंत मोरेंची भरसभेत स्तुतीसुमनं

Mumbai Accident : कफ परेड परिसरात भरधाव गाडीने चार ते पाच जणांना उडवले, एक ठार