शिवसेनेने शब्द पाळला; रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुणाली मोरेला दिले हक्काच घर

रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमावलेल्या रुणाली मोरे हिला ठाणे महानगरपालिकेने हक्काचे घर दिले आहे. शिवनसेनेने रुपालीला हक्काचे घर देण्याचं आश्वासन दिलं होतं.

शिवसेनेने शब्द पाळला; रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुणाली मोरेला दिले हक्काच घर
runali more

ठाणे: शिवसेनेने रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमावलेल्या रुणाली मोरेला शब्द पाळला आहे. शिवसेनेच्या प्रयत्नानंतर ठाणे महानगरपालिकेने रुणालीला हक्काचे घर दिले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रुणालीला नवीन घराची चावी दिली. त्यावेळी रुणालीचे सर्व कुटुंब उपस्थित होतं.

रुणाली मोरेला  रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते. स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी कामानिमित्त घराबाहेर पडलेली रुणाली ही ट्रेन मध्ये चढली, मात्र त्याचवेळी गर्दीचा धक्का लागून ती लोकलच्या खाली पडली. या दुर्घटनेत दुर्दैवाने तिला आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी तिच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचलून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. यासोबतच शिवसेनेच्या वतीने तिला पुन्हा तिच्या पायावर उभे करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

ठाणे पालिकेचा पुढाकार

मूळच्या मानपाडा येथे राहणाऱ्या रुणाली कडे हक्काचं घर नव्हते. त्यामुळे तिची ही अडचण दूर करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने तिला ठाण्यात घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज शिंदे यांच्या निवासस्थानी रुणाली हिला तिच्या या नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली.

डॉक्टर बनण्याचा खर्चही उचलला

रुणाली हिच्यावर नियतीने घाला घातला असला तरीही तीला पुन्हा तिच्या पायवर उभे करण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील शिवसेनेने उचलला होता. आता तिला हक्काच घरकुल देऊन तिच्यासमोरील निवाऱ्याचा प्रश्नही निकाली काढला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मदतीने तिला ठाण्यात घरकुल उपलब्ध करून देऊन शिवसेनेने आपला दिलेला शब्द पाळला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी ! एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठ्या पगारवाढीची घोषणा, जाणून घ्या, कोणत्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती हजारानं वाढला ?

एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगार वाढ; ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 वर्षांची त्यांचा पगार 7 हजाराने वाढला

ST Workets Strike : ठाकरे सरकारडून पगारवाढीची घोषणा, एसटी कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI