AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठ्या पगारवाढीची घोषणा, जाणून घ्या, कोणत्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती हजारानं वाढला ?

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते.

मोठी बातमी ! एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठ्या पगारवाढीची घोषणा, जाणून घ्या, कोणत्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती हजारानं वाढला ?
अनिल परब, एसटी कर्मचारी आंदोलन
| Edited By: sagar joshi | Updated on: Nov 24, 2021 | 7:06 PM
Share

मुंबई : मागील तीन आठवड्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ केल्याची माहिती परब यांनी यावेळी दिलीय. (Anil Parab’s big announcement Exactly how much will the salary of ST employees be increased?)

‘मागील 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. या संपात कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची प्रमुख मागणी होती. याबाबत सरकार म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत होतो. आणि माननीय उच्च न्यायालयात हा विषय गेल्यावर त्यावेळी एक त्रिसदस्यीय समिती बनवली. विलिनीकरणाचा निर्यण 12 आठवड्याच्या आत समितीने घ्यावा असा आदेश देण्यात आला होता. या विलिनीकरणाचा जो विषय आहे त्याबाबतच आपलं म्हणणं समितीसमोर मांडावं. समितीने तो अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर मांडावा आणि त्यानंतर तो उच्च न्यायालयात द्यावा असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सरकारची भूमिका ही उच्च न्यायालयाचं पालन करणारी असल्यानं समितीचा जो काही निर्णय येईल तो आम्ही मान्य करु अशी भूमिका जाहीर केली होती’, असं परब म्हणाले.

‘समितीचा निर्णय येईपर्यंत तिढा कायम ठेवता येणार नाही’

‘संप दिवसेंदिवस लांबत असल्यामुळे सामान्य जनता आणि विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे असावेळी काय करायचं याबाबत सतत विचार करत होतो. नंतर याबाबत आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माझे सहकारी उदय सामंत यांनी यात बरंच मोठं काम केलं. यावर सरकारतर्फे आम्ही एक प्रस्ताव ठेवला की विलिनीकरणाचा निर्णय समितीने राज्य सरकारनं दिला तर तो आम्हाला मान्य असेल. पण तो निर्णय़ येईपर्यंत हा तिढा कायम ठेवता येणार नाही. म्हणून सरकारनं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या निर्णय घेतलाय. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे, अशी घोषणा परब यांनी केलीय.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार?

1 ते 10 वर्षे सेवा- मूळ वेतनात 5 हजाराची वाढ, त्यामुळे मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्याचं वेतन आता 17 हजार 395 रुपये. त्याचं पूर्ण वेतन जे 17 हजार 80 रुपये होतं ते आता 24 हजार 594 रुपये झालं आहे. साधारण 7 हजार दोनशे रुपयांची म्हणजे एकूण 41 टक्के वाढ.

10 ते 20 वर्षे सेवा – मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ. ज्यांचा पगार 16 हजार रुपये होता त्यांचा पगार 23 हजार 40 रुपये झाला. त्यांचा पूर्ण पगार आता 28 हजार 800 रुपये झालाय.

20 वर्षे आणि त्याहून अधिक सेवा – 2 हजार 500 रुपयांची वाढ. ज्यांचं मूळ वेतन 26 हजार रुपये होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये होतं. त्यांचा पूर्ण पगार आता 41 हजार 40 झालं आहे. ज्यांचं मूळ वेतन 37 हजार होतं आणि स्थुल वेतन 53 हजार 280 रुपये होतं. त्यांचा मुळ वेतन 39 हजार 500 होईल, तर सुधारित वेतन 56 हजार 880 रुपये होईल.

इतर बातम्या :

कृषी कायदे रद्द करून हमीभावाचा फुलप्रुफ कायदा येईपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही – नाना पटोले

आता महिलांनी स्वत:च कायदा हातात घ्यायचा का?; विजया रहाटकर यांचा संतप्त सवाल

Anil Parab’s big announcement Exactly how much will the salary of ST employees be increased?

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...