Video : दहा वर्षाच्या जलपरीचा अनोखा विक्रम, काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवरून प्रवास

| Updated on: Jan 29, 2022 | 1:33 PM

ठाण्यात जलपरी या नावानं लोकप्रिय असणाऱ्या कु. सई आशिष पाटील(Sai Ashish Patil)नं वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी काश्मीर (Kashmir) ते कन्याकुमारी (Kanyakumari) हा प्रवास चक्क सायकलवरून पूर्ण करत विक्रम प्रस्थापित केलाय. यापूर्वीदेखील सईनं वयाच्या सहाव्या वर्षी पुलवामा हल्ल्याच्या निषेध व्यक्त करत ठाण्याच्या खाडीवरून 100 फूट उंचीवरून उडी घेत अनोखा विक्रम केला होता.

Video : दहा वर्षाच्या जलपरीचा अनोखा विक्रम, काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवरून प्रवास
सई आशिष पाटील
Follow us on

ठाणे : ठाण्यात जलपरी या नावानं लोकप्रिय असणाऱ्या कु. सई आशिष पाटील(Sai Ashish Patil)नं वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी काश्मीर (Kashmir) ते कन्याकुमारी (Kanyakumari) हा प्रवास चक्क सायकलवरून पूर्ण करत विक्रम प्रस्थापित केलाय. यापूर्वीदेखील सईनं वयाच्या सहाव्या वर्षी पुलवामा हल्ल्याच्या निषेध व्यक्त करत ठाण्याच्या खाडीवरून 100 फूट उंचीवरून उडी घेत अनोखा विक्रम केला होता. सई सहा वर्षाची असताना तिनं कंसाचा खडक ते उरण हे 11 किमीचं अंतर एक तासात पूर्ण केलेलं. याबद्दल तिचा अनेकांनी सत्कार केला असून तिनं अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. सईचा खूप अभिमान वाटतो. संपूर्ण देशात तिचा नावलौकिक झालेला आहे. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना अशी शिकवण देऊन खंबीरपणे मागे उभं राहिलं पाहिजे, असं सईचे आईवडील म्हणाले.

समस्या आल्या, पण…

सईनं 16 डिसेंबर 2021 रोजी काश्मीरमधील कटरा येथील पवित्र वैष्णोदेवीच्या प्रवेशद्वारापासून प्रवास प्रारंभ केला. सुमारे 3639 किमीचा हा प्रवास तिनं अवघ्या 38 दिवसात पूर्ण केला. हे आकडे इतके मोठे आहेत, की ते पाहताच आपणा सर्वांना तिच्या मेहनतीचा अनुमान लावणंदेखील कठीण होईल. भारतात डिसेबर -जानेवारी म्हटलं, की थंडी आलीच. त्यात या काळात उत्तरेकडील राज्यातील थंडीत सईनं आपला प्रवास पूर्ण केलाय. अनेक समस्या तिच्या प्रवासात आल्या परंतु न डगमगता खंबीरपणे हा विक्रम सईने पूर्ण केला.

यापूर्वीही केलीय नेत्रदीपक कामगिरी

यापूर्वी सईनं अशी अनेकवेळा नेत्रदीपक कामगिरी केलीय. ठाणे महापौर जलतरण स्पर्धेत बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाइल, बटरफ्लाय, बेस्ट्रोक स्पर्धेत पदक पटकावली. क्षेत्र कार्ला ते बाळकूम ठाणे हा 120 किमीचा प्रवास फक्त सहा तासात पूर्ण केला. भारत मातेच्या संरक्षणार्थ वीरमरण आलेल्या शहिद जवानांना श्रद्धांजली समर्पित करीत कारगील ते श्रीनगर हा 220 किमीचा यशस्वी सायकल प्रवास केला. अमृतसर ते अटारी बॉर्डर सायकल चालवीत भारतीय जवानांप्रती अभिमान व्यक्त केला.

प्रवासादरम्यान दिले संदेश

जलपरी सई पाटीलनं विक्रमी सायकल प्रवासादरम्यान मुलगी वाचावा, मुलगी शिकवा, स्त्रीभूण हत्या थांबवा, माझे आरोग्य माझी जबाबदारी, असे विविध संदेश दिलेत. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्या ध्येयाला पाठिंबा देण्याचा सल्ला सईच्या पालकांनी दिलाय.

आणखी बातम्या

घरातच वाईनचा साठा ठेवता येणार, बारही उडवता येणार; काय आहे भाजपच्या मध्यप्रदेशातील वाईन धोरण?

Wine पिऊन गाडी चालवली तर बार दाखवणार की तुरूंग? यूझरच्या प्रश्नाला मुंबई पोलिसांचंही गंमतीदार उत्तर…

Mumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती