आनंद दिघे यांच्या पुतण्याचा एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले, कोणी शिकवण घेतली आणि…

Thackeray Group Leader Kedar Dighe on Eknath Shinde : केदार दिघे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला... आनंद दिघे आणि गुरू शिष्य परंपरेवर बोलताना नेमकं काय म्हणाले? ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या यादीवर केदार दिघे नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

आनंद दिघे यांच्या पुतण्याचा एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले, कोणी शिकवण घेतली आणि...
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 3:58 PM

आज ठाकरे गटाच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यावर आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. पक्षातील जे उमेदवार घोषित झालेले आहेत त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. राजे विचारे यांची या वेळेला तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल. सर्वसामान्यांच्या मनामनात राजन विचारे हे पुन्हा खासदार व्हावे. राजन विचारे यांची निष्ठा पक्षासाठी आहे. गुरु प्रति असलेली शिष्याची शिकवण हे राजन विचारे यांच्या माध्यमातून दिसून येते, असं म्हणत केदार दिघे यांनी विरोधकांना विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला आहे.

केदार दिघेंचा टोला

आनंद दिघे यांची कोणी शिकवण घेतली आणि ती कोणी आचरणात आणली, हे महत्त्वाचं आहे. मात्र समज कौतुक करतो ती शाबासकीची थाप आपण स्वीकारली पाहिजे. स्वतःचं कौतुक न गाणं व स्वतःचं सांगणं आणि बढाया मारणे असं करू नये. खासदार राजन विचारे साहेब चांगलं काम करतात आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचा नाव मोठं करत आहेत, असं म्हणत केदार दिघेंनी टोला लगावला.

मी माझ्या पक्षाचा जिल्हाप्रमुखमधून आम्हाला उमेदवार दिले गेले. त्यांच्या बाबतीत बोलू शकतो. राजन विचारे यांनी ठाण्यात छोट्या पासून मोठी गोष्ट सर्वच केलेली आहे. म्हणून लोकांचा कोण हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार राजन विचारे यांच्यासोबत आहे, असं केदार दिघे म्हणाले.

कल्याणमधून उमेदवारी मिळणार?

कल्याणमधून पुतणे केदार दिघे मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघेंना यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना कल्याण लोकसभेबाबत वरिष्ठांशी बोलणं झालेलं नाही. मात्र शिवसेना पक्षाचे परंपरा ही बाळासाहेब ठाकरे दिघे साहेबांपासून पक्षप्रमुखांनी आदेश दिला त्याचं पालन कार्यकर्त्यांनी करावं असं आहे. कल्याण लोकसभेच्या निवडणुकीबाबत पक्षाने आदेश दिला. तर कार्यकर्ता म्हणून मी नक्कीच सज्ज आहे, असं दिघे म्हणाले.

ते तर आमचं कर्तव्य- दिघे

आमच्या पक्षाचा आणि पक्ष प्रमुखांचा आदेश दिलेल्या उमेदवाराला विजयी करणे हे आमचं कर्तव्य आहे. यासाठी दिवस रात्र एकत्र करून मेहनत पणाला लावून उमेदवाराला जिंकून हे एवढंच ध्येय आहे. लोकांच्या उपयोगी येणाऱ्या उमेदवार उद्धव ठाकरे यांनी दिलाय त्याला निवडून आणणार त्यासाठी आम्ही काम करतो मात्र त्यांच्या पक्षात काय चाललंय आपापसात काय सुरू आहे हे त्यांनी त्यांचा पाहावं. ठाणे जिल्हा नाही तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तो नक्कीच विजय होणार आहे. लोकांचा कौल उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनेच लागेल आणि महाविकास आघाडीच्या वतीने लागेल, असं केदार दिघे म्हणाले.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.