Thane: आता कसं वाटतंय.. मनसेकडून शिवसेनेला पोस्टरबाजीचे चिमटे!

ठाणे, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) आज कल्याणमध्ये दाखल झाले. कल्याण डोंबिवलीतील ताकद वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने (MNS) सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने शिवसेनेला पोस्टरबाजीतून (Banner in Kalyan Dombivali) चिमटे काढले आहेत.  ‘आता कसं वाटतय बरं बरं वाटतय… कारण पेराल तेच उगवणार’ अशा आशयाचे फलक लावून शिवसेनेला टोमणा मारला […]

Thane: आता कसं वाटतंय.. मनसेकडून शिवसेनेला पोस्टरबाजीचे चिमटे!
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 3:46 PM

ठाणे, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) आज कल्याणमध्ये दाखल झाले. कल्याण डोंबिवलीतील ताकद वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने (MNS) सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने शिवसेनेला पोस्टरबाजीतून (Banner in Kalyan Dombivali) चिमटे काढले आहेत.  ‘आता कसं वाटतय बरं बरं वाटतय… कारण पेराल तेच उगवणार’ अशा आशयाचे फलक लावून शिवसेनेला टोमणा मारला आहे. शिवसेनेतील बंडखोरी आणि त्यामुळे पडलेली फूट या पार्श्वभूमीवर हे फलक चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेनेची प्रचारधुरा ज्याप्रमाणे आदित्य ठारेंनी हाती घेतली आहे त्याच प्रमाणे मनसेमध्ये अमित ठाकरेसुद्धा ‘ॲक्टिव्ह मोड’वर असल्याचे दिसत आहेत.  आगामी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि यापुढील काळातील पक्षाची रणनीती  याविषयी चर्चा करण्यासाठी युवा नेते अमित ठाकरे आज कल्याण डोंबिवलीत दाखल झाले.

खडकपाडा येथील स्प्रींग टाईन हॉटेलमध्ये त्यांच्या बैठका होत आहेत. सकाळी ते कल्याणमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून दुपारी डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तरुण वर्गाला मनसेसोबत जोडण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्यांना प्राधान्याने लक्ष देण्याचे आदेश युवा नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सोप्या गोष्टी पण कठीण होऊन बसल्या आहेत या विषयावर मनसेकडून आवाज उठविला जाणार आहे, असे पदाधिकाऱ्याने सांगितले. शिवसेनेतील बंडखोरीनंतर कल्याण डोंबिवलीत ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेनेची विभागणी झाली आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ होतो का याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

अमित ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मनसेचे शहरातील सर्व कार्यालये खुली ठेवण्यात आली आहेत. मनसेची कल्याण डोंबिवलीतील ताकद मोठी आहे आणि हे आम्ही आमच्या शक्तिप्रदर्शनातून दाखवून देतो, असे आमदार प्रमोद पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे युवा नेत्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शहरात भरगच्च कार्यक्रम मनसेने आयोजित केले आहेत. बैठकीत काय चाललय यापेक्षा मनसेने शिवसेनेला डिवचणारे फलक लावल्याने तोच शहरात चर्चेचा विषय झाला आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.