कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी ठाणे महापालिका पुन्हा कामाला, आयुक्त-महापौर थेट कोविड वॉर रुममध्ये दाखल

| Updated on: Jun 10, 2021 | 4:01 PM

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. ठाण्यातही कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. मात्र, कोरोनाची तिसरी लाट कधीही येऊ शकते, असा अंदाज सर्वसामान्यांनी वर्तवला आहे (TMC commissioner Vipin Sharma and Mayor Ganpat Mhaske visit covid war room)

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी ठाणे महापालिका पुन्हा कामाला, आयुक्त-महापौर थेट कोविड वॉर रुममध्ये दाखल
Follow us on

ठाणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. ठाण्यातही कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. मात्र, कोरोनाची तिसरी लाट कधीही येऊ शकते, असा अंदाज सर्वसामान्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे आपण सक्षम असणे जास्त आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका वैद्यकीय सोयी सुविधांसह प्रशासनास आणखी सक्षम करत आहे. यासाठी मनुष्यबळ वाढवण्यासह आणखी काही महत्त्वपूर्ण आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्याकडून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोविड वॉर रुमचं कामकाज कसं सुरु आहे, हे पाहण्यासाठी आज महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा कोविड वॉर रुमला भेट दिली (TMC commissioner Vipin Sharma and Mayor Ganpat Mhaske visit covid war room).

महापौर आणि आयुक्तांकडून कोविड वॉर रुमचा आढावा

यावेळी महापालिका आयुक्त आणि महापौर यांनी संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला. ठाणे शहरात कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता उपलब्ध असणारी कोविड हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्णवाहिका तसेच इतर मुलभूत माहिती तात्काळ देण्यासाठी कोविड वॉर रूममध्ये मनुष्यबळ आणि संपर्क क्रमांक वाढवून ती अधिक सक्षम करण्यात आली आहेत, असं त्यांच्या निदर्शनास आलं (TMC commissioner Vipin Sharma and Mayor Ganpat Mhaske visit covid war room).

हेल्पलाईन संपर्क क्रमांक वाढवण्यात आले

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोविड वॉर रूमने अधिक प्रभावीपणे काम केले आहे. कोविड वॉर रूम अधिक सक्षम करण्यासाठी नवीन हेल्पलाईन संपर्क क्रमांक वाढविण्यासोबतच मनुष्यबळ वाढविण्याचे आदेश डॉ. विपिन शर्मा यांनी यापूर्वीच दिले होते. त्यापार्श्वभूमीवर वॅाररूममधील 20 सर्वच संपर्क क्रमांक एकाच क्रमांकाने जोडण्यात आले आहेत.

महापौर-आयुक्तांकडून कामांची खातरजमा

यामध्ये आणखी मनुष्यबळ वाढवून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड वॉर रूम सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागास दिले. त्यामुळे नागरिकांना आता संपर्क क्रमांक बिझी असल्यामुळे कोणतीही प्रतीक्षा न करता तात्काळ संपर्क साधून उपलब्ध माहिती घेता येणार आहे. यावेळी कोविड वॉर रूममधील संपर्क +९१ ७३०६३ ३०३३० सुरळीपणे चालू आहे का? याबाबत महापौर आणि आयुक्तांनी स्वतः खातरजमा करुन घेतली. तसेच कोविड वॉरमध्ये संपर्क साधल्यास कशा पद्धतीने नागरिकांना प्रतिसाद दिला जातो, याचीही खातरजमा केली.

कोविड वॉर रुमच्या कामांवर समाधान व्यक्त

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका सक्षम असल्याबाबत महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार व्यक्त केले. शहरातील उपलब्ध जवळचे रुग्णालय, उपलब्ध बेड्स, तसेच अत्यावश्यक रुग्णवाहिका आदी माहिती तात्काळ मिळण्यासाठी नागरिकांनी +९१ ७३०६३ ३०३३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.

यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, कार्यकारी अभियंता भरत भिवापूरकर, रामदास शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा : ठाकरे-मोदी भेटीवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, महाविकास आघाडीबाबतही मोठं भाकीत