AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Suicide : दोन दिवसात दोघांची आत्महत्या, ऐन तारुण्यात टोकाचे पाऊल, डोंबिवली हादरली

निखिलने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. तर करणचे वडिलांसोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात त्याने आत्महत्या केली. दोन्ही आत्महत्येची डोंबिवली लोहमार्ग पोलिसात करण्यात आली आहे. केवळ 18 वर्षी दोन्ही तरुणाने असे टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Dombivali Suicide : दोन दिवसात दोघांची आत्महत्या, ऐन तारुण्यात टोकाचे पाऊल, डोंबिवली हादरली
दोन दिवसात दोन तरुणांची आत्महत्याImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 17, 2022 | 4:53 PM
Share

डोंबिवली : गेल्या दोन दिवसात दोन 18 वर्षीय तरुणांनी आत्महत्या (Suicide) केल्याने डोंबिवलीत खळबळ माजली आहे. निखिल श्रीकांत ओहल (18) आणि करण अर्जुन शेट्टी (18) अशी आत्महत्या करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे डोंबिवली हादरली असून सांस्कृतिक शहरात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. निखिलने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. तर करणचे वडिलांसोबत भांडण (Dispute) झाल्याने रागाच्या भरात त्याने आत्महत्या केली. दोन्ही आत्महत्येची डोंबिवली लोहमार्ग पोलिसा (Dombivali Railway Police)त करण्यात आली आहे. केवळ 18 व्या वर्षी दोन्ही तरुणाने असे टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अज्ञात कारणावरुन निखिल ओहलने स्वतःला संपवले

मिळालेल्या रेल्वेकडून माहितीनुसार, निखिल श्रीकांत ओहल असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या आयरेगावातील समतानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या निखिल ओहल हा तरुण राहत होता. गुरुवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली ते कोपर रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या लोकल समोर येऊन आपली जीवनयात्रा संपवली. मोटरमनने रेल्वे स्टेशन प्रबंधकांना सदर घटनेची माहिती दिली. स्टेशन प्रबंधकांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती वपोनी मुकेश ढगे यांनी दिली. मात्र निखिलने का आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही.

वडिलांशी झालेल्या भांडणातून करण शेट्टीची आत्महत्या

डोंबिवली पूर्वकडील म्हात्रे नगरमध्ये करण अर्जुन शेट्टी हा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. करणचे बुधवारी सकाळी आपल्या वडिलांशी काही कारणाने भांडण झाले होते. याच रागातून करण घराबाहेर पडला आणि थेट रेल्वे ट्र्रॅक गाठला. कोपर ते दिवा स्थानका दरम्यान सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने लोकलसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. करणच्या या टोकाच्या निर्णयामुळे शेट्टी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही घटनांची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिसात करण्यात आली आहे. (Two youths commit suicide by jumping under a train in Dombivali for various reasons)

Follow Us
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?