Virar Bus Fire : विरारमध्ये मुलांच्या शाळेच्या धावत्या बसला भीषण आग

Virar Bus Fire : किती वाजता आणि कुठे घडली घटना? आगीत बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. ही घटना घडल्याने परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.

Virar Bus Fire : विरारमध्ये मुलांच्या शाळेच्या धावत्या बसला भीषण आग
Virar bus fire
| Edited By: | Updated on: Jun 28, 2023 | 12:36 PM

विरार : विरारमध्ये आज सकाळी एका शाळेच्या बसला भीषण आग लागण्याची घटना घडली. विरार पश्चिमेच्या विवा कॉलेज रस्त्यावर आज सकाळी 8 वाजता अचानक बसने पेट घेतला. शॉर्टसर्किट झाल्याने बसमध्ये आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीत बस पूर्णतः जळून खाक झाली आहे.

बस चालक व क्लिनरच्या सर्तकतेमुळे बसमधील शाळकरी मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मुलांना बाहेर काढल्यानंतर अगीचा भडका वाढला व त्यात बस जळून खाक झाली आहे.

परिसरात भितीचे वातावरण

वसई-विरार महापालिकेच्या अग्निशन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन आग आणखी वाढणार नाही याची काळजी घेतली. सकाळच्या वेळेत ही घटना घडल्याने परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us