विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कुठे आणि का झाली? राऊतांचा थेट सवाल, पोस्ट केलेल्या video नं मोठी खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, अलिबागमध्ये राहुल नार्वेकरांसोबत मालमत्ता मोजणीवरून वाद झाल्याचा आरोप होत आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, यावर संजय राऊत यांनी ट्विट करत नार्वेकरांना डिवचलं आहे.

विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कुठे आणि का झाली? राऊतांचा थेट सवाल, पोस्ट केलेल्या video नं मोठी खळबळ
Sanjay Raut, Rahul Narvekar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 14, 2026 | 5:41 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. अलिबागमध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मालमत्ता मोजणीवरून वाद झाल्याचा आरोप होत आहे. रमेश पाटील यांच्या जागेत प्रवेश केल्यानं वाद झाला असा देखील आरोप होत आहे. राहुल नार्वेकर यांच्यासोबत जमीन मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी रमेश पाटील यांच्या जागेत प्रवेश केल्यानं कर्मचारी आणि रमेश पाटील यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये या वादात राहुल नार्वेकर मध्यस्थी करताना देखील दिसून येत आहेत. यावर आता संजय राऊत यांनी ट्विट करत नार्वेकर यांना डिवचलं आहे. तर दुसरीकडे रमेश पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, या वादात राहुल नार्वेकर यांचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. ही सर्व घटना अलिबागमधल्या म्हात्रोळी गावातील आहे. याच गावात रमेश पाटील यांच्या शेजारी राहुल नार्वेकर यांची देखील मालमत्ता आहे.

नेमकं काय म्हणाले रमेश पाटील?  

परवा जो व्हिडीओ व्हायरल झाला तो व्हिडीओ माझा आणि शेजाऱ्याचा जमिनी मोजणीवरून सुरू असलेल्या वादाचा आहे. आणि त्याचदरम्यान नार्वेकर साहेब या ठिकाणावरून जात होते, त्यामुळे त्यांचा व्हिडीओ चुकून चित्रीत  झाला आहे, या वादाशी त्यांचा काहीही संबंध नाहीये. ते उलट आम्हालाच सांगत होते, तुम्ही तुमचा वाद आपआपसात मिटून घ्या. ही परवाची घटना आहे. असं रमेश पाटील यांनी म्हटलं आहे. रमेश पाटील यांच्याच शेजारी राहुल नार्वेकरांची देखील मालमत्ता आहे.

 

संजय राऊतांची प्रतिक्रिया  

दरम्यान दुसरीकडे या व्हिडीओवरून संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना डिवचलं आहे. त्यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.  विधान सभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू? असा थेट सवालच संजय राऊत यांनी केला आहे.

Follow Us