AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्याच्या शिवाजीनगर, हिंजवडी मेट्रोला सप्टेंबरचा मुहूर्त? मोदींना फडणवीसांनी दिले निमंत्रण

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची क्षमता असलेला शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो - ३ चा १३.३ किमीचा टप्पा बांधून तयार झाला आहे. १२ स्थानकांच्या मार्गाचा पहिला टप्पा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्याने हा टप्पा सप्टेंबरमध्ये सेवेत येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

पुण्याच्या शिवाजीनगर, हिंजवडी मेट्रोला सप्टेंबरचा मुहूर्त? मोदींना फडणवीसांनी दिले निमंत्रण
pune metro 3
| Updated on: Aug 17, 2026 | 7:02 PM
Share

पुण्याच्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो तयार असूनही या मेट्रोच्या उद्घाटनास विलंब होत असल्याने पुणेकरांना मेट्रोची प्रतिक्षा लागली आहे.या मेट्रोमुळे पुणेकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे आणि तसेच पुणेकरांची प्रदुषणातून सुटका होणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो तीन हा १३.३ किमीचा टप्पा बांधून तयार आहे. हा १२ स्थानकांच्या मार्गाचा पहिला टप्पा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, या मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने उदघाटन लांबल्याचे बोलले जात आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट दिली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये ही मेट्रो तीन सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.

पुण्याच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे बांधकाम होऊन ती उदघाटनासाठी सज्ज झाली आहे.मात्र,तिच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नसल्याने पुणेकर कातावले आहेत.या संदर्भात सोशल मीडियातून नाराजी व्यक्त होत होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुण्याच्या मेट्रो तीनच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात ही मेट्रो तीन पुणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी ४५ मिनिटांत

पुणेकरांची लवकरच वाहतूकीच्या कोंडीतून सुटका होणार आहे. पुण्याच्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो – तीनचा १३.३ किमीचा माण ते आर.के. लक्ष्मण म्युझियम हा १२ स्थानकांचा पहिला टप्पा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. हा कॉरिडॉर आता डिस्ट्रीक्ट कोर्टापर्यंत वाढवला जात असल्याने तो भविष्यात महा मेट्रो नेटवर्कशी जोडला जाणार आहे. पुणे मेट्रो लाईन-तीन सुरु झाल्यानंतर सध्या शिवाजीनगर ते हिंजवडी प्रवासाला लागणारा हा दीड तासांचा वेळ आता केवळ ४५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेची मोठी बचत होणार असून प्रवाशांची प्रदुषण आणि वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

Follow Us
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल