AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री कुत्री भुंकूत होती, जाऊन पाहिले तर अंगणात अचानक प्रकटली मगर…

नदीच्या किनारी राहणाऱ्यांसाठी मोठी चिंतेची बातमी आहे. घरातून बाहेर जाताना तुमचे स्वागताला दारात थेट मगर देखील येऊ शकते. कारण तशी घटनाच घडली आहे.

रात्री कुत्री भुंकूत होती, जाऊन पाहिले तर अंगणात अचानक प्रकटली मगर...
crocodile entered in a house
| Updated on: Aug 17, 2026 | 6:54 PM
Share

गोव्याच्या खांडेपार येथे रात्रीच्या वेळी एका घरात अचानक मगर शिरल्याने खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या मगरीला पाहून कुत्र्यांनी अचानक भुंकायला सुरुवात केल्याने घरातील लोक सावध झाले आणि त्यांनी प्राणी मित्राला बोलावले. त्यानंतर प्राणी मित्राने या मगरीला कोणतीही दुखापत न करता तिला सुखरुपणे रेस्क्यू केले आहे. या घटनेमुळे नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसात नद्यांची पाण्याची पातळी वाढल्यामुळे मगरी मानवी वस्तीमध्ये शिरण्याच्या घटनांमध्ये अलिकडे मोठी वाढ होत आहे. लोकांनी घाबरुन न जाता संबंधित यंत्रणांना या मगरींची माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

गोव्याच्या खांडेपार परिसरातील एका घरात अचानक मगर अवतरल्याने परिसरात मोठी खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या मगरीला रात्री अचानक आल्याचे पाहून कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली. त्यामुळे घरातील लोक सावध झाले आणि त्यांनी या मगरीची सुटका करण्यासाठी प्राणी मित्र चरण देसाई यांना पाचारण केले. त्यानंतर चरण देसाई यांनी अत्यंत कौशल्य आणि सावधानतेने मगरीला कोणतीही दुखापत न करता तिची सुखरुप सुटका केली आहे. मुसळधार पावसाने नदीची पातळी वाढल्याने मगरींचे प्रस्थ वाढले आहे. अशा वेळी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि मगर दिसल्यास तिच्याजवळ न जाता तातडीने वन विभाग तसेच प्राणी मित्रांना किंवा पोलिस – अग्निशमन यंत्रणेला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पवई तलाव परिसरातही शिरली होती मगर

मुंबईतील पवई तलाव परिसरात नुकतीच एक मगर मानवी वस्तीत शिरल्याची घटना घडली होती. पवईतील मोरारजी नगर आणि दरगा परिसरात सुमारे सात फूट लांबीची मगर नागरी वस्तीत शिरल्याने घबराट उडाली होती. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. वनविभाग आणि वन्यजीव बचाव पथकाने (SARRP आणि RAWW) तात्काळ कारवाई करत या मगरीची सुटका केली आणि तिला सुरक्षितपणे जेरबंद केले होते. मगरीचे वास्तव्य तलाव आणि नद्यांमध्ये जास्त असते. सुरत येथील बुलेट ट्रेनच्या कार्यालयात मागे रात्रीच्या वेळी मगर शिरल्याचा एक व्हिडीओ काही वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात