AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ठरलं? 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? CM फडणवीसांबाबत मोठी माहिती समोर; दिल्लीत…

Narendra Modi Cabinet Expansion : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत संपूर्ण देशात चर्चा आहे. अशातच आता या विस्ताराची तारीख समोर आली आहे.

अखेर ठरलं? 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? CM फडणवीसांबाबत मोठी माहिती समोर; दिल्लीत...
Modi Cabinet Expansion DateImage Credit source: Google
| Updated on: Aug 17, 2026 | 8:11 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत संपूर्ण देशात चर्चा आहे. अशातच आता या विस्ताराची तारीख समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण खात्याची जबाबदारी कोणत्या नेत्याला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का? या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तरही 21 ऑगस्टला मिळणार आहे.

21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता

समोर आलेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. 2024 साली मोदी सरकारचा शपथविधी झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा एकदाही विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्ताराकडे देशाचं लक्ष लागले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक प्रश्न समोर येत आहेत. यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या धर्मेंद्र प्रधानांची कॅबिनेटमध्ये पुन्हा एन्ट्री होणार का? हा आहे. विद्यार्थी आंदोलनामुळं राजीनामा द्यावा लागलेल्या धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार की महाराष्ट्रातच राहणार? या प्रश्नाचेही उत्तर समोर येणार आहे.

फडणवीस दिल्लीत?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जात पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमण आणि भूपेंद्र यादव यांनाही भेटले. त्यामुळं फडणवीस केंद्रात जाणार की महाराष्ट्रातच राहणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र केंद्रात जाण्याच्या चर्चांचं फडणवीसांनी खंडन केलं आहे, मी महाराष्ट्रातच राहणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पियूष गोयल यांचं वाणिज्य मंत्रालय जाणार की राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर गजेंद्रसिंह शेखावत यांचं पर्यटन मंत्रालय जाणार की राहणार? याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कारण पर्यटन मंत्रालय पंतप्रधान स्वत:जवळ ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच