Pune : बसमध्ये 22 प्रवाशी अन् शिंदवणे घाटातच ‘ब्रेक फेल’, चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशाला साधे खरचटलेही नाही

| Updated on: May 20, 2022 | 2:03 PM

सासवडहून पीएमपीएल बस ही शुक्रवारी सकाळी उरळीकांचनच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये जेमतेम असे 22 प्रवाशी होते. दमरम्यान, बस ही शिंदेवणे घाटातील उतारावर असलेल्या मंदिराजवळ आली असता बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालक किशोर कदम यांच्या लक्षात आले. त्यांनी न घाबरता ओढावलेल्या परस्थितीशी सामना करण्याचा निर्धार केला.

Pune : बसमध्ये 22 प्रवाशी अन् शिंदवणे घाटातच ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशाला साधे खरचटलेही नाही
बस चालक किशोर कदम आणि वाहक
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे :  (Shindawane Ghat) शिंदवणे घाटातून उरळीकांचनच्या दिशेने निघालेल्या पीएमपीएल (Bus Break Fail) बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजता घडली. उतारावरुन गाडीचे ब्रेक फेल असताना (Driver) बस चालकाच्या प्रसंगावधनाने गाडीतील 22 प्रवाशांपैकी कुणाला साधेही खरचटलेही नाही. बस चालकाने सर्वकश प्रयत्न करुन बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न तर केलाच पण घाटातील वळणावर चालक किशोर कदम यांनी वेग कमी केला आणि घाट्याच्या पायथ्याशी बस थांबवली. या संपूर्ण थरारामध्ये एकाही प्रवाशाला इजा पोहचू न दिलेल्या किशोर कदम यांचे कौतुक होत आहे.

नेमकी घटन घडली कशी?

सासवडहून पीएमपीएल बस ही शुक्रवारी सकाळी उरळीकांचनच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये जेमतेम असे 22 प्रवाशी होते. दमरम्यान, बस ही शिंदेवणे घाटातील उतारावर असलेल्या मंदिराजवळ आली असता बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालक किशोर कदम यांच्या लक्षात आले. त्यांनी न घाबरता ओढावलेल्या परस्थितीशी सामना करण्याचा निर्धार केला. कारण बसमध्ये त्यांचा एकट्याचा जीव नव्हता तर 22 जण हे प्रवास करीत होते. यावर एकच पर्याय म्हणून त्यांनी बस कंट्रोल करण्याचाच प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात घाटातील दोन ठिकाणच्या वळणावर त्यांनी बस धडकवली आणि वेगानुसार ती नियंत्रणात आणली. किशोर कदम यांच्या प्रसंगावधानाने 22 जणांचा जीव वाचला आहे.

22 प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

भर उतारावर बसचे ब्रेक फेल ही प्रत्येक प्रवाशासाठी धक्कादायक बाब होती. नेमके उतारावरच हा प्रकार घडल्याने बसमधील 22 प्रवाशी हे आपला जीव मूठीत घेऊन प्रवास करीत होती. किशोर कदम यांचा आत्मविश्वास आणि प्रसांगवधान यामुळे 22 प्रवाशांचा जीव वाचला. मात्र, दोन वेळच्या वळणावर आता आयुष्य हे वेगळ्याच वळणावर जाणार की काय असे विचार मनात आल्याचे प्रवाशांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

https://www.youtube.com/watch?v=M7foyMRhQ8E

असे मिळवले बसवर नियंत्रण…

भर उतारावरील बस नियंत्रणात आणण्यासाठी किशोर कदम यांना केवळ गेअरचा आधार होता. पण बस नियंत्रणात येत नव्हती.  मात्र, वळणावर बस चालक किशोर यांच्या नियंत्रणात आली. भर सकाळी घटना घडल्याने वाहनांची वर्दळ नव्हती. मात्र, किशोर यांच्या प्रसांगवधानतेचे आणि धाडसाचे कोतुक होत आहे.