Special | देशातली पहिली बीएसएल 3 लॅब नाशिकमध्ये; 25 कोटी खर्चून निर्मिती, काय काम, महामारीत महत्त्व कसे?

| Updated on: Feb 19, 2022 | 10:20 AM

प्रतिबंधित क्षेत्रासाठीच्या फिरत्या प्रयोगशाळेत हवा खेळती ठेवण्याची, संपर्काची अद्ययावत सोय आणि समुदायात संसर्ग पसरण्याचा धोका कमी असल्याने या नमुन्यांवर जलदगतीने प्रक्रिया करून सुरक्षितपणे चाचणी केली जाऊ शकेल. या कामांमुळे अशा आजारांचा उद्रेक झाल्यास त्यावर त्या जागी आणि योग्य वेळेत निदान करून उपाययोजना सुरू करता येतील.

Special | देशातली पहिली बीएसएल 3 लॅब नाशिकमध्ये; 25 कोटी खर्चून निर्मिती, काय काम, महामारीत महत्त्व कसे?
देशातल्या पहिल्या बीएसएल 3 मोबाइल लॅबचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये देशातल्या पहिल्या बीएसएल 3 मोबाइल लॅबचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म विषाणूपासून होणारे कोविडसारखे इतर संभाव्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM – ABHIM ) च्या अंतर्गत जैवसुरक्षा श्रेणी-3 (BSL-3) ही फिरती प्रयोगशाळा 25 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलीय.  डॉ. भारती पवार यांनी यावेळी दक्षिण पूर्व आशियातील पहिली बायोसेफ्टी श्रेणी 3 फिरती प्रयोगशाळा महाराष्ट्रात निर्माण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांचे आभार मानले. आयसीएमआर-राष्ट्रीय विषाणू संस्था आणि क्लेंजाईड्स कंपनी यांनी एकत्रितपणे काम करत अत्यंत अत्याधुनिक अशी बायोसेफ्टी श्रेणी 3 फिरती प्रयोगशाळा, संपूर्ण भारतीय साहित्य वापरून केल्याबद्दल त्यांनी सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे कौतुक केले.

नेमके काय काम करते?

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ बलराम भार्गव म्हणाले की, प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचा (PM-ABHIM) भाग म्हणून आरोग्य संशोधन संचालनालय आणि भारतीय वैद्यकीय परिषद (ICMR) यांनी ही स्वदेशी बनावटीची बायोसेफ्टी श्रेणी-3 ची प्रतिबंधक क्षेत्रासाठी खास बनवून घेतली आहे. या प्रयोगशाळेच्या मदतीने नव्याने येणाऱ्या आणि पुनःपुन्हा येणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचा शोध घेता येईल. बायोसेफ्टी श्रेणी-3 फिरत्या प्रयोगशाळेविषयी आयसीएमआर आणि क्लेंज़ाईड्स कंपनीने एकत्र येत, भारतातील पहिली फिरती बीएसएल-3 अद्ययावत प्रयोगशाळा- बायोक्लेंजची रचना करत विकसित केली आहे. ही प्रयोगशाळा सर्वाधिक घातक अशा संसर्गजन्य विषाणूचा शोध घेण्यास सक्षम आहे. या प्रयोगशाळेसाठी वापरण्यात आलेले 95 टक्के साहित्य भारतात बनलेले आहे. अत्याधुनिक अशा या प्रयोगशाळेतील रियल टाइम डेटा हा ‘आयसीएमआर’ला थेट उपलब्ध होईल हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

बीएसएल-3 दर्जा कसा मिळाला?

बायोक्लेंज़ची निर्मिती क्लेंजाईड्सने त्यांच्या सर्वोत्तम सुविधांचा वापर या प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. भारत बेस बस चेसिस (सांगाडा) वर ही प्रयोगशाळा बांधण्यात आली असून ती कुठेही- अगदी दुर्गम भागात देखील सहजपणे, कुठल्याही इतर साधनांची मदत न घेता, एखाद्या बसप्रमाणे घेऊन जाता येते.फिरत्या बीएसएल- 3 प्रयोगशाळेची वैशिष्ट्ये म्हणजे ही एक अत्याधुनिक आणि सुसज्ज, स्वयंपूर्ण अशी प्रयोगशाळा असून या संशोधनासाठी आवश्यक अशी सर्व व्यवस्था आणि उपकरणे या प्रयोगशाळेत आहेत. त्यामुळे जिथे परीक्षण करायचे असेल, तिथे इतर कुठल्याही अतिरिक्त उपकरणांची गरज भासणार नाही. ही प्रयोगशाळा हवाबंद असून, तिथे प्रवेश नियंत्रित आणि जैव-संसर्ग प्रतिबंधक असेल. या प्रयोगशाळेत एचईपीए फिल्टरेशन आणि जैविक द्रवरूप कचरा संसर्ग प्रतिबंधक व्यवस्था देखील आहे, यामुळेच, या प्रयोगशाळेला बीएसएल-3 अत्याधुनिक असा दर्जा मिळाला आहे.

प्रयोगशाळेत कुठल्या सुविधा?

अतिशय आधुनिक अशा स्वयंचलित नियंत्रण व्यवस्थेद्वारे प्रयोगशाळेचे नियंत्रण केले जाऊ शकेल. ज्यामुळे, संशोधनाच्या जागी हवेचा निगेटिव्ह दाब कायम ठेवला जाईल. तसेच उपकरणांच्या गुणवत्तेचे निकष आणि आवश्यक त्या महितीचे व्यवस्थापन देखील केले जाईल. प्रयोगशाळेत दोन बायोसेफ्टी कॅबिनेट्स (श्रेणी II A2 प्रकार) असून त्यात, नमुने हाताळणी, निर्जंतुकीकरणासाठीची ऑटोक्लेव्ह व्यवस्था, गतिमान पद्धतीचे पास बॉक्स आणि जलद हस्तांतरण व्यवस्था-ज्याद्वारे सर्व साहित्य लॅबच्या आतबाहेर जलदगतीने नेता येतील. लॅबमधील इतर महत्वाच्या उपकरणांमध्ये कार्बनडाय ऑक्सईड इनकयूबेटर, ऑटोमेटेड न्यूक्लिक अॅसिड बाहेर काढणारी यंत्रणा, पीसीआर वर्कस्टेशन, शीत सेंट्रीफ्यूज, डीप फ्रीजर (-80֯C & -20֯C) यांचा समावेश आहे. या प्रयोगशाळेत अनेक प्रकारच्या सुरक्षा उपायांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामुळे काम करण्यासाठी अतिशय सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.

महामारीत कशी ठरेल महत्त्वाची?

या प्रयोगशाळेमुळे देशाच्या दुर्गम भागात जाता येईल जिथे. आयसीएमआरचे – एनआयव्ही, आरएमआरसी – गोरखपूर या सारखे आयसीएमआरचे विशेष प्रशिक्षित वैज्ञानिक मनुष्य आणि प्राण्यांच्या नमुन्यांची चाचणी करून महामारीच्या उद्रेकाचा शोध घेऊ शकतील. या प्रतिबंधित क्षेत्रासाठीच्या फिरत्या प्रयोगशाळेत हवा खेळती ठेवण्याची, संपर्काची अद्ययावत सोय आणि समुदायात संसर्ग पसरण्याचा धोका कमी असल्याने या नमुन्यांवर जलदगतीने प्रक्रिया करून सुरक्षितपणे चाचणी केली जाऊ शकेल. या कामांमुळे अशा आजारांचा उद्रेक झाल्यास त्यावर त्या जागी आणि योग्य वेळेत निदान करून उपाययोजना सुरू करता येतील. वेळीच हस्तक्षेप केल्याने महामारीचा उद्रेक नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि प्रतिबंध ठेवून योग्य रुग्ण व्यवस्थापन करता येईल.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!