संतप्त ठाकरे गटाचे शिवसैनिक म्हाडा कार्यालयात घुसले, जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी काय केलं?

| Updated on: Jan 31, 2023 | 1:55 PM

अनिल परब यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात जमलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना रोखल्याचे पाहून म्हाडाचे कार्यालयात घुसून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

संतप्त ठाकरे गटाचे शिवसैनिक म्हाडा कार्यालयात घुसले, जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी काय केलं?
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : अनिल परब आणि किरीट सोमय्या यांच्यातील संघर्ष अधिक टोकाला गेला आहे. अनिल परब यांचे ज्या सोसायटीत घरं होतं त्या सोसायटीत अनिल परब आमदार झाल्यानंतर सोसायटीच्या मालकी जागेत जनसंपर्क कार्यालय करावे अशी इच्छा येथील रहिवाशांनी केली होती. कित्येक वर्षापासून मी जागा वापरत होतो. माझे कार्यालय अनधिकृत आहे असे भासवून कार्यालय तोडण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मला म्हाडा नोटिस दिली होती. त्याला मी उत्तर दिले होते त्यावरून म्हाडाने नोटिस मागे घेतली. किरीट सोमय्या कोण आहे? अधिकारी आहे का? घरं पाडली गेली तर त्याला जबाबदार किरीट सोमय्या राहील असं अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. याशिवाय आम्ही सगळे किरीट सोमय्याचे स्वागत करायला तयार आहोत म्हणत किरीट सोमय्या यांना अनिल परब यांनी खुलं आव्हान दिलं होतं. त्यावरून संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट म्हाडाचे कार्यालयात गाठत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

याच दरम्यान किरीट सोमय्या हे अनिल परब यांचं जिथं अनधिकृत कार्यालय तोडलं होतं तिथ पाहण्यासाठी जाणार होते. मात्र पोलीसांनी त्यांना वांद्र्याच्या दिशेने जातांना रोखलं होतं.

अनिल परब यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात जमलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना रोखल्याचे पाहून म्हाडाचे कार्यालयात घुसून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

हे सुद्धा वाचा

म्हाडाच्या कार्यालयात शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यन्त म्हाडाचे अधिकारी उत्तर देणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

म्हाडाचे 56 वसाहती आहेत. तेथील नागरिकांनी थोडी-थोडी जागा वाढवली असल्याचे सांगत पाडकाम केलं जाऊ शकतं त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे म्हाडाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले होते.

अनिल परब हे ज्या सोसायटीचे रहिवासी आहेत. तेथील नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यातील वाड अधिकचा चिघळला आहे. येत्या काळात काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.