Jogeshwari Vikhroli Link Road : चिंता मिटली; जेव्हीएलआर उड्डाणपुलाची दुरुस्ती पूर्ण, उद्या सकाळी वाहतुकीस होणार खुला

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामंडळाने कंत्राटदाराला वेगाने काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, शनिवारी काम पूर्ण झाले आहे.

Jogeshwari Vikhroli Link Road : चिंता मिटली; जेव्हीएलआर उड्डाणपुलाची दुरुस्ती पूर्ण, उद्या सकाळी वाहतुकीस होणार खुला
जेव्हीएलआर
Image Credit source: tv9
| Updated on: May 21, 2022 | 7:12 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (Maharashtra State Road Development Corporation) विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील जेव्हीएलआर म्हणजेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या (flyover) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी या उड्डाणपुलाच्या विभिन्न भागांतील सांधे भरण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ज्यामुळे सुमारे हा उड्डाणपुल सुमारे 10 दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक वळविण्यात आली होती. ज्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी (traffic jam) दिसून आली होती. मात्र आता मुंबई करांसाठी चांगली बातमी आली असून जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे उद्या सकाळी हा उड्डाणपूल पुन्हा वाहतुकीस पूर्णत: खुला करण्यात येणार आहे.

लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम

विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील जेव्हीएलआर म्हणजेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे 13 मे पासून वाहतूक बंद करण्यात आली होती. तर वाहतूक पोलिसांनी 24 मेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक दिला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामंडळाने कंत्राटदाराला वेगाने काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, शनिवारी काम पूर्ण झाले आहे. तर वाहतूक पोलिसांनी मंजूर केलेल्या वेळापत्रकाच्या दोन दिवस आधीच दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे रविवारी (22 मे) सकाळी सहा वाजल्यापासून उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

कशासाठी बंद करण्यात आला होता जेव्हीएलआर

विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील जेव्हीएलआर म्हणजेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून काम हाती घेण्यात आले होते. यादरम्यान तीन महिन्यांपूर्वी उड्डाणपुलाच्या 200 बेअरींग बदलण्यासह एक्सपान्शन जॉइंट अर्थात दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी 148 बेअरींग बदलण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली होती. मात्र आता एक्सपान्शन जॉइंट अर्थात दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून सांगितले होते. त्यामुळे हा उड्डाणपूल बंद ठेवावा लागणार होता. तर या काळात उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.