Jogeshwari Vikhroli Link Road : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाणपूल 10 दिवस बंद

Jogeshwari Vikhroli Link Road : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाणपूल 10 दिवस बंद
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड
Image Credit source: tv9

आजपासून पुढील 10 दिवस जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाणपूल बंद राहणार असून त्याचा फटका वाहनचालकांना बसण्यास सुरूवात झाली आहे. आज सकाळपासूनच विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 15, 2022 | 2:14 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (Maharashtra State Road Development Corporation) विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील जेव्हीएलआर म्हणजेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या (flyover) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तर या उड्डाणपुलाच्या विभिन्न भागांतील सांधे भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच हे कामं किमान आजपासून पुढील 10 दिवस होणार असल्याने या काळात पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. तर यादरम्यान वाहतूक वळविण्यात येणार असून रस्त्यावर कोंडी (traffic jam) होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याप्रमाणे आज सकाळपासूनच या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे समोर येत आहे. तर पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे रूग्णसेवेवर त्याचा ताण येत असून रूग्णवाहीका देखील अडकल्याचे समोर येत आहे.

विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील जेव्हीएलआर म्हणजेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून काम हाती घेण्यात आले आहे. यादरम्यान तीन महिन्यांपूर्वी उड्डाणपुलाच्या 200 बेअरींग बदलण्यासह एक्सपान्शन जॉइंट अर्थात दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी तर आता पर्यंत 148 बेअरींग बदलण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली आहे. मात्र आता एक्सपान्शन जॉइंट अर्थात दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल बंद ठेवावा लागणार आहे. या काळात उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू राहील.

हे सुद्धा वाचा

वाहनांच्या लांबच लांब रांगा

आजपासून पुढील 10 दिवस जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाणपूल बंद राहणार असून त्याचा फटका वाहनचालकांना बसण्यास सुरूवात झाली आहे. आज सकाळपासूनच विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर याचा फटका रुग्णवाहिकांनाही बसताना देखील दिसत आहे. यात एका रुग्णवाहिकेतून रुग्णांचे नातेवाईक थेट वाहन धारकाना हात जोडत रुग्णवाहिका बाहेर काढत रुग्णालयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें