यंदाच्या हंगामातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद कुठे? राज्यातील पारा घसरला

महाबळेश्वर पेक्षा निफाड तालुका थंड असल्याचे समोर आले आहे, या कडाक्याच्या थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक शेकोट्या पेटवत आहे.

यंदाच्या हंगामातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद कुठे? राज्यातील पारा घसरला
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 9:31 AM

उमेश पारिक, निफाड (नाशिक) : राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे थंड हवेचे ठिकाण म्हणून निफाडची ओळख होऊ लागली आहे. उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात थंड वारे येत असल्याने सलग दुसऱ्या दिवशीही थंडीचा कडाका वाढल्याने 17.1 अंशावरून थेट 4.9 अंशापर्यंत निफाड चा पारा घसरला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 6.3 अंश सेल्सिअस तर साकोरे मिग येथे 5.2 अंश सेल्सिअस तर ओझर येथील एचएएल येथे 4.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची निच्चांकी नोंद झाली आहे.

महाबळेश्वर पेक्षा निफाड तालुका थंड असल्याचे समोर आले आहे, या कडाक्याच्या थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक शेकोट्या पेटवत आहे.

मात्र दुसरीकडे थंडी वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे. थंडी अशी टिकून राहिली तर द्राक्षबागेवर भुरी ,डाऊनी या रोगाचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

याशिवाय द्राक्ष बागांच्या पक्क्या मन्याणा तडे जाण्याची स्थिती निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे तर ही वाढती थंडी गहू , हरभरा, कांदा, लसूण, ज्वारी पिकांना फायदेशीर आहे.

तर दुसरीकडे पुणे शहरातही पारा घसरला आहे. शहर परिसरात तापमानात एकाच दिवसात अचानक मोठी घट झाली असून शुक्रवारी पुण्यात ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

निफाड तालुक्याचा असा घसरला किमान तापमानाचा पारा- – दिनांक 6 मंगळवार रोजी 17.1 अंश सेल्सिअस किमान तापमान – दिनांक 7 मंगळवार रोजी 14.5 अंश सेल्सिअस किमान तापमान – दिनांक 8 मंगळवार रोजी 13.1 अंश सेल्सिअस किमान तापमान – दिनांक 9 मंगळवार रोजी 7.2 अंश सेल्सिअस किमान तापमान – दिनांक 10 मंगळवार रोजी 4.9 अंश सेल्सिअस किमान तापमान

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.