मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरला, शिवसेनेला मोठा झटका, कोणाच्या वाट्याला कोणती जागा?

मोठी बातमी समोर येत आहे. अखेर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे. पुण्याच्या दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानं हा शिवसेनेसाठी मोठा झटका मानला जात आहे.

मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरला, शिवसेनेला मोठा झटका, कोणाच्या वाट्याला कोणती जागा?
महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 5:15 PM

मोठी बातमी समोर येत आहे. अखेर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे आता समोर आलं आहे. शिवसेना शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे. पुण्याच्या शिक्षक मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा करण्यात आला होता, तर पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला होता, पंरतु आता हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले आहेत. हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मंगेश चिवटे हे उत्सुक होते. परंतु आता शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यामुळे चिवटे यांचा पत्ता कट झाला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून नावांची यादी वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांकडे भाजपच्या वतीने तीन जागांसाठी 15 संभाव्य नावांची यादी सुपूर्द करण्यात आली आहे.  प्रत्येक जागेसाठी 5 नावांचा पर्याय देण्यात आला असून, एकून 15 नावांची यादी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे सादर करण्यात आली आहे.  त्यामुळे आता या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...

विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्यूल्यानुसार पुणे पदवीधर, पुणे शिक्षक व नागपूर पदवीधर या तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. तर  अमरावतीची जागा शिवसेनेच्या वाट्याला आणि छत्रपती संभाजीनगर येथील जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू होती.  अखेर भाजपच पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्यावर महायुतीमध्ये एकमत झालं आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील इच्छूक नाराज होण्याची शक्यता आहे. त्यांची समजूत पक्ष कसा काढणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.  पुण्याच्या दोन्ही जागांसाठी दहा संभाव्य नावे भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे यामुळे शिवसेनेमध्ये नाराजीचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us