वडापावची किंमत वाढणार, वडापावची किंमत वाढण्यामागील काय आहे कारण ?

पावाच्या भट्टीसाठी लागणारे अन्य सामानदेखील महागले आहे. डिझेल दरवाढीमुळे वाहतूक महागली आहे. यामुळे पाव उत्पादन ते विक्री, या खर्चात जवळपास निम्म्याने वाढ झाली आहे,

वडापावची किंमत वाढणार, वडापावची किंमत वाढण्यामागील काय आहे कारण ?
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 10:27 AM

इगतपुरी ( नाशिक ) : ववडापाव म्हंटलं की सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारा नाष्टा, कितीही घाईगडबडीत असलं तरी वडपाव चालता-चालता खाता येऊ शकतो. महाराष्ट्रातील नागरिकांना वडापाव माहिती नाही किंवा पाहिला नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. त्याचे कारण म्हणजे वडापाव कुठेही मिळतो. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत वडापावला अधिकची पसंती असेल यामध्ये शंकाच नाही. सकाळी लवकर घराबाहेर पडणारे, हातावर पोट असलेल्या अनेक चाकरमान्यांना पोटभरण्यासाठी कित्येकदा वडापावचाच आधार असतो. परंतु भुकेच्या वेळी पोटाला आधार देणारा हा आवडता वडापाव आता महागणार आहे. पावाच्या दरात 30% वाढ झाल्याने वडापावसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

20 रुपयाला मिळणारी 15 पावांची लादी आता 30 रुपयांना मिळणार आहे. पावचे दर वाढलेत याचे कारण म्हणजे पाव बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल महागला असल्याचे पाव उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे.

पाव महागला असल्याने आपल्या हिशोबाला ठसका बसणार आहे. या दरवाढीमुळे साधारणपणे 14 ते 15 रुपयांना मिळत असलेला वडापाव आता 18 ते 20 रुपयांना मिळेल.

तर साधे वडापाव विक्रेतेदेखील आपल्याकडील 12 रुपयांना देण्यात येणारा वडापावचा भाव वाढवत 14 ते 15 रुपये लवकरच करतील अशी माहिती समोर येत आहे.

मागील वर्षापर्यंत पावासाठीच्या मैद्याचे 50 किलोचे पोते 1200 ते 1400 रुपयांना मिळत होते. त्याचा दर आता 1750 रुपयांच्या घरात गेला आहे.

पावाच्या भट्टीसाठी लागणारे अन्य सामानदेखील महागले आहे. डिझेल दरवाढीमुळे वाहतूक महागली आहे. यामुळे पाव उत्पादन ते विक्री, या खर्चात जवळपास निम्म्याने वाढ झाली आहे,

पाव उत्पादक संघटनेशी संलग्नित असलेले पाव पुरवठादार जगदीश रावत यांनी सांगितले आहे की, येणाऱ्या काळात पावाचे दर आणखी वाढण्याची शक्यता असून वडापावचे दर देखील वाढू शकणार आहे.

एकूणच शहरी भागात आणि ग्रामीण भागात वडापावचे दर वेगवेगळे असले तरी साधारणपणे प्रत्येक ठिकाणी चार ते पाच रुपयांनी वडापावचे दर वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.