मुंबई प्रमाणे पुण्यातही भुयारी मेट्रोचे काम सुसाट; मार्च 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार

| Updated on: Aug 18, 2022 | 8:28 PM

स्वारगेट ते बुधवार पेठ अंडरग्राऊड मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. निगडी ते सिव्हिल कोर्ट आणि कोथरूड कोथरूड ते सिव्हिल कोर्ट मार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. एकूण 12 किमीचा हा मार्ग असून आता याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित भुयारी मार्गात (Underground route) सिग्नलिंग यंत्रणा, मेट्रोचे रूळ, विद्युत व्यवस्था अशी कामे करण्यात येणार आहेत.

मुंबई प्रमाणे पुण्यातही भुयारी मेट्रोचे काम सुसाट; मार्च 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार
पुणे मेट्रो अंडरग्राऊंड काम करणारी टीबीएम मशीन
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मुंबई प्रमाणे पुण्यातही भुयारी मेट्रोचे काम सुसाट सुरु आहे. लवकरच पुण्यातील भुयारी मेट्रोची(Pune Underground Metro) चाचणी होणार आहे. रेंज हिल ते स्वारगेट या भुयारी मार्गच काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. पुणे मेट्रो प्रकल्पाच काम प्रगतीपथावर आहे. मार्च 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा विश्वास ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे. पुणे मेट्रोचा हा भुयारी मार्ग न्यायालयापासून मुठा नदीच्या पात्रातून बुधवार पेठेकडे गेला आहे. या मार्गात स्वारगेट, मंडई, बुधवार पेठ, न्यायालय तसेच शिवाजीनगर अशी पाच स्थानके आहेत.

जगभरातील मेट्रो प्रकल्प तोट्यात असले तरी पुण्यातील मेट्रो प्रकल्प पांढरा हत्ती ठरणार नाही असा विश्वास महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच काम प्रगतीपथावर असून मार्च 2023 पर्यंत प्रकल्प पूर्णत्वाला आलेला असेल. त्यातील रेंज हिल्स स्टेशन तसेच सिव्हील कोर्ट जंक्शनचं काम पुढील 3 महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे दीक्षित यांनी सांगीतले.
पुणे मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा 33.1 किमी लांबीचा आहे. यात वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांचा समावेश आहे. सध्या, या दोन मार्गांवर मेट्रो अंशतः कार्यान्वित आहे – वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंत 5 किमीची लाइन आणि पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडीपर्यंत 7 किमीची लाFन – दोन मार्गांवर पाच मेट्रो स्टेशन आहेत.

स्वारगेट ते बुधवार पेठ अंडरग्राऊड मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. निगडी ते सिव्हिल कोर्ट आणि कोथरूड कोथरूड ते सिव्हिल कोर्ट मार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. एकूण 12 किमीचा हा मार्ग असून आता याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित भुयारी मार्गात (Underground route) सिग्नलिंग यंत्रणा, मेट्रोचे रूळ, विद्युत व्यवस्था अशी कामे करण्यात येणार आहेत. अंडरग्राऊंड दोन मार्ग आहेत. एक म्हणजे स्वारगेटकडे जाणारा आणि दुसरा स्वारगेटकडून येणारा. या मार्गात रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. विद्युत यंत्रणा बसविण्याचे काम दुसऱ्या मार्गात सुरू आहे. मेट्रोसाठी हे दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात आले आहेत. या भुयारी मार्गवर लवकरच ट्रायल रन घेतली आहे. शिवाजीनगर आणि सिव्हिल कोर्ट या भुयारी स्टेशनच काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च 2023 पर्यत पुण्यात मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण होतील. विस्तारित मार्गांचा आराखड महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे पाठवला असल्याचेही दीक्षितांनी सांगीतले.

पुण्यात 15 ऑगस्टला 88 हजार पुणेकरांनी मेट्रो प्रवास केला. पुण्याची जशी सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे. आत्ताच हे पुण शहर मेट्रो सिटी म्हणून सुद्धा ओळख होणार आहे. हा भुयारी मेट्रो प्रकल्प पुणेकरांसाठी आकर्षणाचा विषय बनला आहे. पुणेकर या भुयारी मेट्रोच्या प्रतिक्षेत आहेत.