धाड… धाड… दिवाळीत कोसळणार सोन्याच्या भाव, तज्ज्ञांचा मोठा अंदाज, थेट 10 ग्रॅम सोने..

मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे. त्यातच पुढील काही दिवसात सोन्याचे भाव अजून खाली जाण्याचा अंदाज आहे. सोने खरेदीची ही मोठी संधी म्हणावी लागेल.

धाड... धाड... दिवाळीत कोसळणार सोन्याच्या भाव, तज्ज्ञांचा मोठा अंदाज, थेट 10 ग्रॅम सोने..
Gold prices
| Updated on: Oct 25, 2026 | 10:52 AM

सोने आणि चांदाचे दर गेल्या काही दिवसांपासून घसरताना दिसत आहेत. त्यातच जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. कच्च्या तेलाचा भाव 117 प्रति डॉलरवर पोहोचला. त्यानंतर सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. चांदीच्या भावातही मोठी घसरण होतंय. देशांतर्गत बाजारपेठेत ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’ (MCX) वर सोन्याचे वायदे प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,42,3000 रुपयांच्या पातळीवर तर चांदीचे वायदे प्रति किलो सुमारे 1, 96, 000 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या किंमती घसरल्या. मध्य पूर्वेत पुन्हा तणाव वाढला आहे. ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीवर त्याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. सोने आणि चांदीचे दर पुढील काही दिवसात अजून खाली जाण्याची शक्यता आहे. भारतात इराण आणि अमेरिका युद्धापूर्वी सोन्याचा दर दोन लाखाच्या आसपास पोहोचला होता.

आता पुन्हा इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. ज्याचा परिणाम थेट सोन्याच्या भावावर होताना दिसतोय. पुढील काही दिवसात भारतात दिवाळी आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. यादरम्यानच सोन्याच्या घरात घसरण होताना दिसत आहे. पुढील काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

Loading...

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, मौल्यवान धातूच्या किंमतीत या आठवड्यात चार टक्क्यांनी घसरण होण्याची शक्यता आहे. मॅके यांच्या मते, सध्या सोन्याच्या बाबतीत गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. कारण पुढील काही दिवसात सोन्याच्या दरात अजून घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदरच ही पाऊले उचलली जात आहेत.

ब्लूमबर्गद्वारे ट्रॅक केल्या जाणाऱ्या सोन्यावर आधारित ETF मध्ये गेल्या 14 आठवड्यांपासून सातत्याने गुंतवणूक येत आहे. हा कल सोन्याच्या किमतींमधील घसरणीच्या अगदी उलट आहे. म्हणजेच काय तर भारतीय लोकांसाठी हा सुवर्णसंधी आहे. ऐन दिवाळाच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होताना दिसेल. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्याची संधी मिळेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us