Anil Parab : बाळासाहेब, स्विस बँक, बोटांचे ठसे यावरुन अनिल परबांचा रामदास कदम यांच्यावर सर्वात मोठा आरोप काय?

Anil Parab : "रामदास कदम यांची अक्कल किती आहे, ती त्या दिवशी दिसली. त्यांनी जे शपथपत्र दिलं ते माझ्या इलेक्शनचं शपथपत्र आहे. त्यात मी गाड्या कशा घेतल्या त्याचा उल्लेख आहे. एखाद्या बिल्डरने गाडी दिली असेल तर मी शपथपत्रात लिहू शकतो का? माझं तर साधं मत आहे"

Anil Parab : बाळासाहेब, स्विस बँक, बोटांचे ठसे यावरुन अनिल परबांचा रामदास कदम यांच्यावर सर्वात मोठा आरोप काय?
Ramdas Kadam-Balasaheb Thackeray
| Updated on: Oct 09, 2025 | 1:26 PM

“बाळासाहेबांनाही हे लोक व्हिलन बनवायला लागले आहेत. मृत्यूनंतर हाताचे ठसे उद्धव ठाकरेंनी घेतले हे चित्र तयार त्यांना तयार करायचं आहे. याचा अर्थ काय होतो माहीत आहे का? याचा अर्थ असा होतो की बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते. तुम्हाला असं म्हणायचं बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते, सांगावं. त्यांचं अकाऊंट नसेल तर ठसे कशाला हवे? हे हळूहळू बाळासाहेबांचं नाव पुसायला निघाले आहेत. बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते आणि ठश्यांशिवाय अकाऊंट उघडू शकत नाही असं यांना भासवायचं आहे. आरोपाचा मतितार्थ असा आहे. बाळासाहेबांचं अकाऊंट स्विस बँकेत आहे असं त्यांना सांगायचंय. अकाऊंट नसेल तर ठश्यांचं काय करणार?” असा सवाल अनिल परब यांनी विचारला.

“उद्धव ठाकरे ठसे कशाला घेतील? यांना बाळासाहेबांचं नाव हळूहळू कमी करायचे आहे. बाळासाहेबांच्या नावाने शिवसेना चाललीय. उद्धव ठाकरे बाळसााहेबांचे पूत्र म्हणून ओळखले जातात. म्हणून बाळासाहेबांचे नाव डॅमेज करायचे आहे. सीबीआयची चौकशी मागावी. चौकशी व्हावी. माझ्यावर जे आरोप आहेत. ते इलेक्शन अॅफिडेव्हिट वाचलंय. मुलगा होम मिनिस्टर आहे. रडता कशाला. चौकशी करा. घर खाली केली म्हणतात, तिथे जाऊन विचारा. मी तिथे कधी गेलो का? 8 हजार लोकांना बेघर केलं. तिथे तेवढी वस्ती तरी आहे का? त्यांना कोण माहिती पुरवतं हे माहीत आहे” असं अनिल परब म्हणाले.

‘बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा मी विश्वस्त होतो’

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी फालतू लोकांना मोजत नाही. मी या प्रकरणात संबंधित होतो. विभागप्रमुख होतो. अंतिम समयी व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी होती. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा मी विश्वस्त होतो. त्यामुळे उत्तर द्यायला मी अधिकृत व्यक्ती आहे. उद्धव ठाकरे त्यांना उत्तर देऊ इच्छित नाही. तेवढी यांची लायकीही नाही. मी याचं उत्तर दिलं, त्याचं कारण हे आहे” असं अनिल परब म्हणाले. “तुमच्या पत्नीला जाळलं की जळाली याची चौकशी व्हावी ही मागणी आहे. त्यात काय चुकीचं आहे. रामदास कदम मागणी करू शकतात, तर मी आमदार आहे. माझी आणि रामदास कदमची मागणी मान्य करा. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे” असं अनिल परब यांनी सांगितलं.