महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगाव बंदी, बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून बंदीचा आदेश जारी

| Updated on: Dec 05, 2022 | 7:53 PM

बेळगाव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील प्रवेश बंदीचा आदेश जारी केला असून बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बंदीचा आदेश काढला आहे.

महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगाव बंदी, बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून बंदीचा आदेश जारी
Follow us on

बेळगावः सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर सीमावाद पेटला आहे. एकीकडे कर्नाटक शासनाकडून सीमाभागातील बेळगावसह परिसरातील नागरिकांवर अन्याय अत्याचार केले जात आहेत. तर दुसरीकडे मात्र जत तालुक्यातील गाावांसह अक्कलकोट, पंढरपूर गावांवही कर्नाटक सरकारकडून दावा केला जात आहे.

त्यामुळे हा वाद आता प्रचंड वाढला आहे. कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमावाद मिठवण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र सरकाकडून त्यासाठी दोन मंत्र्यांचीही निवड करण्यात आली. कारण सीमावाद तात्काळ सोडवून त्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांची निवड करण्यात आली होती.

त्यामुळे आता महाराष्ट्रातील मंत्री बेळगावला जाण्याच्या तयारीत असतानाच महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगाव जिल्हा प्रवेश बंदी करण्यात आली आल्याचे आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी काढले असल्याने आता हा वाद आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

बेळगाव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील प्रवेश बंदीचा आदेश जारी केला असून बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बंदीचा आदेश काढला आहे.

त्यामुळे आता उद्या मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई हे मंत्री बेळगावमध्ये जाणार असल्याने कन्नडीगांनी पुन्हा थयथयाट करण्यास सुरूवात केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यापासून पुढे महाराष्ट्रातील मंत्र्यांना प्रवेश करता येणार नाही. चंद्रकांत पाटील, शंभूराजे देसाई त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने यांनाही बेळगाव जिल्हा बंदी असणार आहे.

महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात प्रवेश बंदी घालण्यात आली असल्याने सीमावाद हा आणखी चिघळण्याच्या मार्गावर आहे.

तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांन आम्ही कर्नाटकात जाणार असल्याचा ठराव पास करून तो सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

त्यामुळे या वादाचा शेवट नेमका कसा होणार याकडेच साऱ्या सीमावासियांचे महाराष्ट्रातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.