मॉर्निंग वॉकला गेला…’या’ कारणाने हृदयाचे ठोके दुपटीने वाढले, ऐकून धक्काच बसेल…

| Updated on: Nov 12, 2022 | 9:47 AM

वारंवार नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने चंद्रपूरमध्ये नागरिकांना कुत्र्याप्रमाणेच वाघ दिसू लागला असून नागरिकांना भयमुक्त जीवन जगता येत नाहीये.

मॉर्निंग वॉकला गेला...या कारणाने हृदयाचे ठोके दुपटीने वाढले, ऐकून धक्काच बसेल...
Image Credit source: Google
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाघाची दहशत मोठ्या प्रमाणात पसरली आहे. नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रहिवासी क्षेत्रातही वाघ दिसू लागल्याने नागरिकांची पळता भुई थोडी होत आहे. थंडीचे दिवस असल्याने अनेक नागरिक मॉर्निंग वॉक घेण्यासाठी बाहेर पडत आहे. अशातच चंद्रपूर येथील रहिवासी प्रवीण मराठे ही मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. शहराच्या जवळ असलेल्या ट्रॅकजवळ त्यांनी त्यांची गाडी पार्क केली होती. त्यांनंतर त्यांनी मॉर्निंग वॉकसाठी सुरुवात केली, मॉर्निंग वॉक पूर्ण होऊन गाडीजवळ परतत असतांना त्यांना समोर वाघ दिसला. वाघाने कुठलाही प्रतिकार केला नाही, किंवा हल्लाही केला नाही. तरीदेखील प्रवीण मराठे यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी ही बाब पाहिल्याने ही संपूर्ण घटना कशी घडली हे समोर आले आहे.

प्रवीण मराठे यांना त्यांच्या गाडीजवळ वाघ दिसला होता, अचानक वाघ दिसल्याने त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते, त्यात कुठल्याही हल्ल्याविना वाघ समोर दिसणे प्रवीण मराठे पचवू शकले नाही.

वाघ दिसल्याने प्रवीण मराठे यांच्या हृदयाचे ठोके वाढले आणि ते जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध झाले होते, नागरिकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही त्यांची कुठलीही हालचाल होत नव्हती.

हे सुद्धा वाचा

मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी रुग्णवाहिकेची वाट ते बघत राहिले. मात्र उशीर झाल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाही.

रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता, प्रवीण मराठे यांना समोर वाघ दिसल्याने त्यांचा बीपी अधिक वाढून गेला होता असं डॉक्टरांचे म्हणणे होते.

चंद्रपूर परीसरातील या घटनेची जोरदार चर्चा होत असून नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहे.

काही दिवसांपूर्वी चंद्रपूरमध्ये शौचालयाला गेलेला एक नागरिक कुत्रा समजून वाघाच्या जवळ गेला होता, मात्र, कुत्रा नसून तो वाघ आहे हे लक्षात येताच त्याने जीव वाचवत आपला जीव वाचविला होता.

वारंवार नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने चंद्रपूरमध्ये नागरिकांना कुत्र्याप्रमाणेच वाघ दिसू लागला असून नागरिकांना भयमुक्त जीवन जगता येत नाहीये.