अवकाळी पावसाचा फटका ; पुण्यात टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो; आवक घटल्याने भाव वाढला

अवकाळी पावसामुळं बाजारपेठेत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मार्केटयार्डमधून होणार टोमॅटोचा पुरवठा कमी झाला आहे. बाजारात येणारा टोमॅटोच्या मालांपैकी निम्म्याहून अधिक खराब माल येत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने टोमॅटोचे भाव वाढले.

अवकाळी पावसाचा फटका ; पुण्यात टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो; आवक घटल्याने भाव वाढला
pune tomato price
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 9:53 AM

पुणे- राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक ठिकाणी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणी आलेला भाजीपाल्यावरही पावसाचा, धुक्याचा गंभीर परिणाम झाला आहे. यामुळे बाजापेठत भाजीपाल्याची आवक घटली आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. शहारातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या महात्मा फुले भाजी मंडईमध्ये भाजीपाल्या महागला आहे. सद्यस्थितीला बाजारपेठेतील टोमॅटोची  80 ते 100 रुपये किलोने विक्री होते आहे.

आवक घटली
अवकाळी पावसामुळं बाजारपेठेत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मार्केटयार्डमधून होणार टोमॅटोचा पुरवठा कमी झाला आहे. बाजारात येणारा टोमॅटोच्या मालांपैकी निम्म्याहून अधिक खराब माल येत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने टोमॅटोचे भाव वाढले असल्याची माहिती व्यापाऱ्यांना दिली आहे.

घाऊक व्यापारी मालामाल
टोमॅटोचे भाव वाढले असले तरी त्याचा फायदा हा शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी वर्गाला अधिक होताना दिसत आहेत. पावसाच्या भीतीनं बाजारात आणलेला माल शेतकरी व्यापारी मागतील त्या किमतीला विकतात. भाजीपाला हा नाशवंत माल असल्याने नासून जाण्यापेक्षा विक्री झालेली चांगली, असा विचार शेतकरी वर्ग करत आहे. मात्र शेतकऱ्यांकडून घाऊक पद्धतीने विकत घेतलेला माल सर्वसामान्य नागरिकांना विकताना मात्र त्याचे दर वाढलेले असतात.

दुसरकीडे मावळ परिसरातील शेतकऱ्यांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेकठिकाणी काढणीला आलेल्या भात शेतीचे पावसामुळं मोठा नुकसान झाले आहे. धुक्यामुळं पिकांवर रोग पडत असल्याचं दिसून आले आहे.

वीटभट्टी धारकांचेही मोठे नुकसान
याबरोबरच अवकाळी पावसामुळे तालुक्यातील वीटभट्टी धारकांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे वीट बांधणीसाठी लागणारी माती वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी कच्या विटांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांप्रमाणे वीटभट्टी चे देखील नुकसानीचे पंचनामे करून शासनाने वीटभट्टी चालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

Paneer Bread Pakora : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या-घरी तयार करा खास पनीर ब्रेड पकोडे, पाहा रेसिपी!

निरोगी जगायचंय?, तुळ राशीवाल्यांनो हे व्यायाम प्रकार ट्राय कराच

Vitamin C : ‘या’ एकाच जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे गंभीर आजार, वाचा सविस्तर!