महाराष्ट्रात गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस पडलेली 10 ठिकाणं

देशातील सर्वाधिक पावसाची नोंद ही गुजरातमधील वडोदरामध्ये करण्यात आली आहे. गुजरातमध्ये एका दिवसात 556 मिमी पाऊस पडला आहे. तर राज्यातील सर्वाधिक पाऊस हा महाबळेश्वरमध्ये झाला आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस पडलेली 10 ठिकाणं
Follow us
| Updated on: Aug 01, 2019 | 5:01 PM

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या 24 तासात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे देशासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक पावसाची नोंद ही गुजरातमधील वडोदरामध्ये याठिकाणी करण्यात आली आहे. गुजरातमध्ये एका दिवसात 556 मिमी पाऊस पडला आहे. तर राज्यातील सर्वाधिक पाऊस हा महाबळेश्वरमध्ये झाला असून या ठिकाणी 202 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. स्कायमेट या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 202 मिमी पाऊस झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पालघरमधील डहाणूची नोंद करण्यात आली आहे. डहाणूमध्ये एका दिवसात 53 मिमी पाऊस पडला आहे.

त्यानंतर कोल्हापूर 46 मिमी, सातारा 44 मिमी, माथेरान 31 मिमी, रत्नागिरी 30 मिमी, सांगली 19 मिमी, अलिबाग 17 मिमी, गोंदिया 17 मिमी आणि नाशिकमध्ये 16 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ही आकडेवारी स्कायमेट या वृत्तसंस्थेने दिली आहे.

तर दुसरीकडे वडोदरामध्ये देशातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. वडोदरामध्ये तब्बल 556 मिमी पाऊस एका दिवसात कोसळला आहे. त्यानंतर अंदमान निकोबार बेटांवर लाँग आयलँड याठिकाणी 90 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्याखाली आसाममधील मझबेट आणि गुवाहटी या ठिकाणी अनुक्रमे 83 आणि 81 मिमी पाऊस पडला आहे.

त्याशिवाय मेघालयमधील चेरापुंजीत 71 मिमी, मध्यप्रदेशातील पाचमऱ्ही 69 मिमी, गुजरात वल्लभ विद्यानगर 55 मिमी, महाराष्ट्रातील डहाणू 53 मिमी आणि आसाम जोरहाट 50 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.