विधानसभेच्या प्रमुख लढती : 2019 ला अटीतटीचा घाम फोडणारा निकाल, आता पुन्हा त्याच उमेदवारांमध्ये लढाई निश्चित?
भाजपने एकूण 99 उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या यादीनंतर काही जागांवर आता प्रमुख लढती ठरल्याचं चित्र आहे. गेल्या निवडणुकीवेळी देखील त्या प्रमुख लढती बघायला मिळाल्या होत्या. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी संबंधित जागांवर अतिशय अटीतटीची लढत बघायला मिळाली होती. या लढतीत खूप कमी फरकाने जय-परायज ठरला होता.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने या निवडणुकीत उमेदवारांची घोषणा करण्यात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील सर्व मोठ्या राजकीय पक्षांमध्ये भाजपने सर्वात आधी उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने एकूण 99 उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या यादीनंतर काही जागांवर आता प्रमुख लढती ठरल्याचं चित्र आहे. गेल्या निवडणुकीवेळी देखील त्या प्रमुख लढती बघायला मिळाल्या होत्या. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी संबंधित जागांवर अतिशय अटीतटीची लढत बघायला मिळाली होती. या लढतीत खूप कमी फरकाने जय-परायज ठरला होता. त्यामुळे या निवडणुकीवेळीदेखील त्या जागांवर चुरस असणार असल्याचं स्पष्ट आहे. या निवडणुकीत कुणाचा विजय होतो आणि कुणाचा पराभव होतो? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
कोणकोणत्या जागांवर जवळपास प्रमुख लढती ठरल्या?
- नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेत प्रमुख लढत देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचे प्रफुल्ल गुदधेंमध्ये होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. 2009 पासून 3 टर्म फडणवीस इथून प्रतिनिधीत्व करत आहेत. ते गेल्यावेळी 49 हजार 344 मतांनी विजयी झाले होते.
- देवळी विधानसभेत भाजपच्या राजेश बकानेंविरोधात काँग्रेसचे रणजित कांबळे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी काँग्रेसच्या कांबळेंनी अपक्ष लढलेल्या बकानेंचा 35 हजार मतांनी पराभव केला होता.
- हिंगणघाटमध्ये भाजपच्या समीर कुणावारांविरोधात शरद पवार गटाचे अतुल वांदिलेंचं नाव ठरु शकतं. गेल्यावेळी कुणावारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा 50 हजार मतांनी पराभव केला होता.
- नागपूर दक्षिण विधानसभेत भाजपच्या मोहन मतेंविरोधात काँग्रेसचे गिरीश पांडवांचं नाव जवळपास निश्चित आहे. गेल्यावेळी मोहन मते ४ हजार मतांनी विजयी झाले होते.
- गोंदियात भाजपच्या विनोद अग्रवालांविरुद्ध काँग्रेसकडून यंदा गोपालदास अग्रवाल लढण्याची चिन्हं आहेत. गेल्यावेळी अपक्ष लढलेल्या विनोद अग्रवालांनी भाजपकडून लढलेल्या गोपालदास अग्रवालांना 27 हजारांनी पराभूत केलं होतं.
- परभणीत जिंतूरमध्ये भाजपच्या मेघना बोर्डिकरांविरोधात शरद पवार गटाचे विजय भामरे लढू शकतात. 2019 बोर्डिकरांनी राष्ट्रवादीच्या भामरेंवर 3 हजार 700 मतांनी विजय मिळवला होता.
- परतूरमध्ये भाजपच्या बबनराव लोणीकरांविरुद्ध यंदा पुन्हा काँग्रेसचे सुरेश जेथलियांचं नाव निश्चित आहे. गेल्यावेळी लोणीकरांनी जेथलियांना 25 हजार 942 मतांनी हरवलं होतं.
- बदनापुरात भाजपच्या नारायण कुचेंविरुद्ध शरद पवार गटाचे बबलू चौधरी उमेदवार असण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी कुचेंनी बबलू चौधरींना 18 हजार 600 मतांनी पराभूत केलं होतं.
- भोकरदनमध्ये भाजपच्या संतोष दानवेंसमोर शरद पवार गटाकडून चंद्रकांत दानवेंचं नाव निश्चित मानलं जातंय. 2009 ला संतोष दानवे चंद्रकांत दानवेंविरोधात 32,490 मतांनी निवडून आले होते.
- फुलंब्रीत भाजपच्या अनुराधा चव्हाणांविरोधात काँग्रेस विलास औताडेंना संधी देवू शकतं. गेल्यावेळी इथं भाजपचे हरिभाऊ बागडेंनी काँग्रेसच्या कल्याण काळेंना 15 हजार 274 मतांनी पराभूत केलं होतं.
- गंगापूरमध्ये भाजपचे प्रशांत बंब विरुद्ध अपक्ष किंवा शरद पवार गटाकडून सतिष चव्हाण उभे राहू शकतात. 2019 ला बंब यांनी राष्ट्रवादीच्या संतोष मानेंवर 34 हजार मतांनी विजय मिळवला होता.