कोरोनाचे नियम पाळून तृतीयपंथीयांकडून छबिना उत्सव साजरा, मंदिरं खुली करण्याची तृतीयपंथीयांची मागणी

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर तृतीयपंथीयाचा छबिना उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी हा उत्सव आयोजित केला जातो. यावेळी देखील कोरनाबाबतचे सर्व नियम पाळून छबिना उत्सव साजरा करण्यात आला.

कोरोनाचे नियम पाळून तृतीयपंथीयांकडून छबिना उत्सव साजरा, मंदिरं खुली करण्याची तृतीयपंथीयांची मागणी

नाशिक : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोनाची परिस्थितीमुळे या उत्सवासाठी तृतीयपंथी समाजाचे मोजकेच प्रतिनिधी उपस्थित होते. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हा उत्सव सप्तसृंशी गडावर दरवर्षी आयोजित केला जातो. या वेळी राज्यातील मंदिरं लवकरात लवकर खुली करावित अशी मागणी तृतीयपंथाच्या प्रतिनिधींनी केली. ( transgender Celebrated Chhabina Utsav demanded to open the temples)

कोरोनाच्या पर्श्वभूमीवर या वर्षीची कावडयात्रा रद्द करण्यात आली. पण तृतीयपंथीयांच्या छबिना उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा खंडित होऊ नये त्यामुळे छबिना उत्सवाला स्थानिक प्रशासानाकडून परवानगी देण्यात आली.

कोजागिरी निमित्त दरवर्षी तृतीयपंथीयांची सप्तश्रंगी गडावर जत्रा असते. मध्यरात्रीच गड गजबजून जातो. यंदा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गडावर नवरात्रोत्सव झाला नाही. तसेच कोजागिरी पौर्णिमेचा उत्सवदेखील होऊ शकला नाही. मात्र, तृतीयपंथीयांच्या यात्रेची म्हणजेच छबिन्याची परंपरा खंडित होऊ नये यासाठी मोजक्या पंधरा जणांना गडावर जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार भास्कर गुरू आणि पायल गुरु यांच्या नेतृत्वाखाली गडावर असलेल्या शिवालय तलावापासून देवी मंदिराच्या पायथ्यापर्यंत देवीच्या मूर्तीला नेण्यात आले. मंदिराच्या पायथ्याजवळ देवीची पूजा करण्यात आली. यावेळी कोरोनाचं संकट टळावं यासाठीही तृतीयपंथीयांकडून देवीला साकडं घालण्यात आलं.

तृतीयपंथीय गटाचे गुरु आखिल भारतीय किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पायल नंदगीरीजी यांच्या नेतृत्वात यावेळी मोजकेच सदस्य उपस्थित होते. यावेळी मंदिरे लवकरात लवकर खुली करावित अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली. तसेच परंपरा खंडित होऊ नये म्हणून परवानगी दिल्याबद्दल तृतीयपंथीयांनी प्रशासनाचे आभार मानले.

संबंधित बातम्या :
सत्ता आमच्या हातात द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करु, तृतीयपंथीयाची मागणी

बाळाला आशीर्वादासाठी तृतीयपंथींकडून 11 हजारांची मागणी, नकार दिल्याने पित्याची हत्या

निमलष्करी दलात आता तृतीयपंथीही दिसणार, BSF कडून हिरवा कंदील

( transgender Celebrated Chhabina Utsav demanded to open the temples)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *